वेब होस्टिंग म्हणजे काय व याचे प्रकार कोणते?

WhatsApp Group Join Group

आजच्या काळात सर्व व्यवसाय ऑनलाईन येण्याच्या तयारीत आहेत. प्रत्येक कंपनी, ब्रँड, छोटे-मोठे व्यवसाय इंटरनेट वर येण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण जर डिजिटल मार्केटिंग, ब्लॉगिंग किंवा वेबसाईट बनवण्याच्या व्यवसाय मध्ये असाल तर आपण होस्टिंग हा शब्द नक्कीच ऐकला असेल. डिजिटल मार्केटिंग करायची असेल किंवा ब्लॉग बनवायचा असेल किंवा एखादे पोर्टल किंवा वेबसाईट सुरू करायची असेल तर आपल्याला होस्टिंग बद्दल माहिती असली पाहिजे.

आजच्या या लेख मध्ये आपण होस्टिंग म्हणजे काय, होस्टिंग किती प्रकारची असते, यासोबतच होस्टिंग कशी कार्य करते हे सुद्धा जाणून घेणार आहोत. वेबसाईट बनवताना प्रत्येकाला दोन गोष्टी घ्याव्या लागतात एक म्हणजे डोमेन नेम आणि दुसरे होस्टिंग, यातील कोणतीही एक गोस्ट नसेल तर इंटरनेट वर वेबसाईट बनवता येत नाही. यामुळे होस्टिंग ची माहिती आपल्याला असली पाहिजे. तर चला होस्टिंग म्हणजे काय हे समजून घेऊयात.

वेब होस्टिंग म्हणजे काय?

जेंव्हा कोणतीही वेबसाईट बनवली जाते तेंव्हा त्यात Images, Videos, Text या स्वरूपातील माहिती अपलोड केली जात असते. वेबसाईट बनवताना आपण आपल्या कॉम्पुटर मध्ये मधून माहिती वेबसाईट वर टाकतो, पण तुम्ही कधी विचार केला का? वेबसाईट वरील माहिती कोठे साठवलेली असते? तर याचे उत्तर आहे होस्टिंग.

होस्टिंग ही एक इंटरनेट सेवा आहे जी आपल्या वेबसाईट ला इंटरनेट वर सुरक्षितेने स्टोर करून ठेवते व वेबसाईट वर येणाऱ्या प्रत्येक Visiter ला आपली वेबसाईट उपलब्ध करून देते.

आपण पाहिले असेल की जेंव्हा आपण फोन मध्ये फोटो काढतो त्यावेळेस तो फोटो आपल्या फोन च्या मेमरी मध्ये साठवला जातो. फोनमध्ये फोटो स्टोर करण्यासाठी जागा असते तिला आपण मेमरी म्हणतो. अगदी याचप्रमाणे इंटरनेट वर माहिती साठवण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या सेवेला होस्टिंग असे म्हणतात. इंटरनेट वर अनेक संस्था आहेत त्या होस्टिंग सुविधा प्रदान करतात.

जेव्हा कोणीही होस्टिंग सुविधा खरेदी करते, त्यावेळेस Hosting Provider आपल्या ब्लॉग, वेबसाईट, ई साठी त्यांच्या Server मध्ये जागा उपलब्ध करून देते व आपण सहजपणे त्यावर वेबसाईट Host करू शकतो. Servers आपणही वैयक्तिक खरेदी करू शकतो पण त्यांची Maintainance Cost खूप असते व त्यामुळे ते परवडत नाही.

वेबसाईट Server वरती स्टोर झाल्यावर ती सर्व वेबसाईट वापरकर्त्यांसाठी खुली केली जाते. वापरकर्ता वेबसाईटवर येण्यासाठी एक खास प्रकारच्या Address ची त्यांना URL असे म्हणतात. URL मध्ये काही विशिष्ट घटक असतात ते आपण नंतर पाहुयात. तर आता आपल्याला होस्टिंग म्हणजे नेमके काय हे समजले असेल आता आपण होस्टिंग च्या प्रकारांची माहिती घेऊयात.

वेब होस्टिंग चे प्रकार कोणते?

उपभोगकर्त्याकडून होणाऱ्या वापरावर आधारित वेब होस्टिंग चे काही प्रकार पडतात. आपल्या आवश्यकता नुसार आपण प्रकार निवडू शकतो. वेब होस्टिंग चे प्रकार हे वेबसाईटवर येत असलेल्या ट्राफिक वर काही अवलंबून असतो. तर चला वेब होस्टिंग च्या चार प्रकारांची माहिती घेऊयात.

1) Shared Web Hosting

Shared Hosting चा अर्थ होतो होस्टिंग एकमेकांशी शेअर करणे. यामध्ये होस्टिंग प्रदाते एका सर्व्हर वर अनेक वेबसाईट ठेवत असतात. जसे एका खोलीत अनेक मित्र सोबत राहत असतात व खोलीतील काही गोष्टी त्यांना सामायिक वापराव्या लागतात. याचप्रमाणे Shared Hosting मध्ये अनेक वेबसाईट एका सर्व्हर वर ठेवल्या जातात.

Shared Hosting मध्ये Storage, RAM, CPU हे सर्व्हर वर असलेल्या वेबसाइट्स ला एकत्रितपणे वापरावे लागते. यामुळे या Shared Hosting खूप कमी किमतीत मिळते बाकी प्रकारच्या तुलनेने. वेबसाईट वर जर रहदारी जास्त आली तर समस्या निर्माण होते, जसे स्पीड कमी होते किंवा यूजर ला काही Technical Issues शी सामना करावा लागू शकतो.

2) Virtual Private Server Hosting

VPS होस्टिंग ही Shared पेक्षा थोडी महाग आहे व Shared पेक्षा जास्त ट्राफिक हँडल करते. यामध्ये एका Server ला अनेक पार्टस मध्ये विभाजले जाते, त्यांना Virtual Server असे म्हणतात. प्रत्येक Virtual Server मध्ये फक्त एकच वेबसाईट ठेवली जाते, त्या Virtual Server मध्ये कोणत्याही दुसऱ्या वेबसाईट का Entry नसते.

समजा एक हॉटेल आहे आणि त्यात अनेक रूम आहेत आणि त्यातील तुम्ही एक रूम विकत घेतली. आता तुमच्या रूम मध्ये फक्त तुम्हीच राहू शकता दुसऱ्या व्यक्तीला रूम मध्ये येता येणार नाही व रूम मधील कोणत्याही वस्तूचा वापर करता येणार नाही. अगदी याचप्रमाणे VPS Hosting चे कार्य चालते. हॉटेल म्हणजे Server आणि Rooms मध्ये Virtual Server. तुमच्या Server मधील Features फक्त तुमच्याच वेबसाईट साठी वापरले जातात.

3) Dedicated Hosting

Dedicated Hosting ही High Traffic येणाऱ्या वेबसाईटसाठी असते. Dedicated Hosting मध्ये पूर्ण Server चा Control तुम्हाला दिला जातो, तुम्ही Server Settings, Operating System मध्ये बदल करू शकता. पूर्ण Server आपल्याकडे असल्याने खूप फायदे होतात. Dedicated Hosting ची किंमत Shared, VPS पेक्षा खूप जास्त असते.

या होस्टिंग वर होस्ट असलेल्या वेबसाईट खूप जास्त ट्राफिक हाताळू शकतात. एका Server वर एकच वेबसाईट होस्ट असल्याने वेबसाईट High Speed आणि Best Performance मिळतो. Dedicated Hosting ही High Traffic वेबसाईटसाठी असल्यामुळे याची किंमत खूप जास्त असते. नवीन ब्लॉगर्स ला Dedicated Hosting परवडणारी नाही.

4) Cloud Hosting

Cloud Hosting ही खूप जास्त ट्राफिक हाताळू शकते, Dedicated Hosting पेक्षाही खूप जास्त. Cloud Hosting मध्ये एका वेबसाईट ला अनेक Server होस्ट करतात. वेबसाईट वर येणाऱ्या ट्राफिक नुसार Servers ची संख्या नियंत्रित केली जाते. Cloud Hosting ची किंमत ही सर्व प्रकार पेक्षा जास्त असते.

वेबसाईट वर आलेल्या ट्राफिक चा परिणाम Speed वर होत नाही हा Cloud Hosting चा फक्त मोठा फायदा आहे. मोठमोठ्या संस्था, बातम्या च्या वेबसाईट, सरकारी वेबसाईट, या होस्टिंग चा उपयोग करतात. एक तोटा आहे की आपण Server च्या Setting मध्ये काहीही करू शकत नाहीत, Server वर आपला Control नसतो.

वेब होस्टिंग कसे कार्य करते?

वेबसाईट ही Images, HTML Text, Videos, ई ची मिळून बनलेली असते. यांना सर्वांना स्वतः ची Size असते, त्याला मोजण्यासाठी Kb, Mb, Gb असे एकक वापरले जातात. सोप्या शब्दात पहायचे झाले तर समजा एक Image आहे व त्याची Size 1Mb आहे, तर त्या Image ला Save करून ठेवण्यासाठी तेवढी 1Mb जागेची आवश्यकता असते. ज्यावेळेस ती आपल्या कॉम्पुटर मध्ये असते त्या वेळेस ती कॉम्पुटर मेमरी मध्ये Store असते.

पण जेंव्हा आपल्याला वेबसाईटवर ती Image टाकायची असते त्यावेळेस आपल्याला इंटरनेट वर Storage असणे आवश्यक असते. आपण आपल्या कॉम्पुटर वर वेबसाईट ला स्टोर नाही करू शकत, कारण वेबसाईट वर भेट देण्यासाठी आलेल्या प्रत्येक Users साठी ती उपलब्ध असायला हवी आणि अशी सुविधा आपले कॉम्पुटर नाही देऊ शकत.

यासाठी एक खास Server ची आवश्यकता असते जे आपली वेबसाईट इंटरनेट वर उपलब्ध करून देईल. तर या Server ची गरज Web Hosting Provider पूर्ण करून देतात. वेब होस्टिंग घेतली म्हणजे इंटरनेट वर आपल्या वेबसाईट साठी जागा घेतली. Web Hosting Provider आपल्याला किमतीवर Storage प्रदान करते व त्यावर आपण आपली वेबसाईट होस्ट करू शकतो.

युजर्स साठी वेबसाईट उपलब्ध करून देण्यासाठी त्या Server वर आपल्या वेबसाईट ची Location ची गरज असते त्यासाठी डोमेन नेम वापरले जाते. डोमेन नेम च्या मदतीने वेबसाईट चा व त्यावरील पेजेस चा एक डिजिटल पत्ता बनवला जातो त्याला URL असे म्हणतात. अश्या प्रकारे वेब होस्टिंग (Hosting in Marathi) कार्य करते. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की वेब होस्टिंग कोण उपलब्ध करून देते तर चला ते पण पाहुयात.

वेब होस्टिंग कोठून विकत घ्यावी?

वेब होस्टिंग म्हणजे इंटरनेट वर स्टोरेज कोठून विकत घ्यावे व कोण ही सेवा विकते? हे आता आपण पाहुयात. वेब होस्टिंग घेताना काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते, त्यातील सर्वात महत्वाची म्हणजे आपल्या वेबसाईट वर सर्वात जास्त ट्राफिक कोठून येणार, कारण जर वेबसाईट चे Server जास्त ट्राफिक येते तेथे असेल तर आपल्याला स्पीड मध्ये फायदा होतो.जर आपली वेबसाईट भारतीय युजर्स साठी असेल तर अशी होस्टिंग निवडावी ज्याचे Server भारतात आहे. खाली मी Indian Traffic साठी लोकप्रिय असलेल्या वेब होस्टिंग प्रदात्यांची नावे देत आहे.

 • 1) Hostinger
 • 2) MilesWeb
 • 3) SiteGround
 • 4) HostGator
 • 5) GreenGeeks

वेब होस्टिंग खरेदी करताना या गोष्टी नक्की पाहा.

Web Hosting Providers कडून होस्टिंग घेताना काही गोष्टीकडे लक्ष द्यावे लागते जेणेकरून आपल्याला जास्त पैसे द्यायची गरज नाही, वेबसाईट च्या ट्राफिक नुसार Hosting Plan निवडावा लागतो. आता आपण वेब होस्टिंग चे Features जाणून घेऊयात.

1) Storage

आपल्या वेबसाईट चा आकार किती मोठा होईल याचा अंदाज घेऊन होस्टिंग घ्यावी. साधारणतः होस्टिंग प्रदाते खूप स्टोरेज उपलब्ध करून देतात, त्यामुळे सहसा Storage फूल होत नाही. वेबसाईट मध्ये जर जास्त Videos किंवा PDF फाइल्स असतील तर जास्त स्टोरेज ची होस्टिंग घ्यावी, कारण यांचा आकार खूप जास्त असतो.

2) Bandwidth

वेबसाईट आणि Visiters यांच्या मधील डेटा ट्रान्सफर Bandwidth मध्ये मोजला जातो. Hosting Providers कडून Monthly Bandwidth किती आहे ते सांगितले जाते. Visiter आपल्या साईट वरील पेजेस ओपन करतो, त्या पेज ची साईझ वरून Bandwidth मोजली जाते. कमी Bandwidth असलेला प्लॅन निवडल्यावर वेबसाईट Slow होण्याची शक्यता असते.

3) Monthly Visits

Monthly Visits हे त्या प्लॅन वर होस्ट असलेल्या वेबसाईट चे सरासरी Monthly Visits दर्शवते, म्हणजे जर प्लॅन मध्ये 25k Visits Monthly दिले असतील तर आपली साईट तेवढे Users हँडल करू शकते. ही मर्यादित संख्या नसते हे फक्त त्या प्लॅन वरील वेबसाईट वरून सरासरी काढलेली असते.

4) Backups

वेबसाईट चा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी Backups ची खूप आवश्यकता असते. आपण पाहिले असेल की कधी कधी कॉम्पुटर वरील काही फाईल्स डिलीट होत असतात, त्याचप्रमाणे Server सुद्धा एक प्रकारे कॉम्पुटरच असते. त्यामुळे डेटा चे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्लॅन घेताना बॅकअप ची सुविधा मिळावी हे लक्षात ठेवा.

5) Customer Support

Customer Support खूप महत्वाचे आहे, जर आपल्याला होस्टिंग संबंधित काहीही Technical समस्या आली किंवा Hosting Setup करताना अडचण आली तर आपण लगेच Customer Support द्वारे कंपनीशी संपर्क साधू शकतो. होस्टिंग प्लॅन निवडताना आधी खात्री करून घ्या की आपल्याला Customer Support मिळणार का नाही, किंवा मिळत असेल तर कसा आहे? कारण ही खूप महत्त्वाची गोस्ट आहे.

निष्कर्ष –

वेब होस्टिंग म्हणजे काय, Web Hosting in Marathi याची संपूर्ण माहिती आता आपल्याला मिळाली आहे. मला आशा आहे की Web Hosting Information आपल्याला पूर्णपणे समजली असेल. जर आपण ब्लॉग किंवा वेबसाईट बनवत असाल तर ही माहिती आपले ज्ञान नक्कीच वाढवणार आहे.

संगणक म्हणजे काय, संपूर्ण बेसिक माहिती

आजच्या लेखविषयी काहीही शंका असेल किंवा काही गोष्टी राहिल्या असतील तर मला कंमेंट करून कळवा. वेब होस्टिंग बद्दल मित्रांना माहिती देण्यासाठी या लेखाला सोशल मीडियावर मित्रांसोबत शेअर करा. अश्याच अधिक माहितीसाठी आपल्या या मराठी ऑनलाईन या ब्लॉगला पुन्हा-पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

5 thoughts on “वेब होस्टिंग म्हणजे काय व याचे प्रकार कोणते?”

  • मराठी ब्लॉगसाठी Hostinger घ्यावी किंवा कमी खर्चात MilesWeb घ्यावी. दोन्हीही खूप मस्त आहेत.

   Reply
 1. आणि ब्लॉगर ची होस्टिंग बाबत काय मत आहे तुमचं?

  Reply
  • ब्लॉगर ची होस्टिंग सर्वात बेस्ट आहे, Unlimited Traffic Handle करते व सुरक्षा गूगल ची आहे, त्यामुळे सुरक्षेची चिंता नाही.

   Reply

Leave a Comment