कीबोर्ड चे 10 प्रकार व त्यांची माहिती

    अनेक Input, Output, Processing आणि Storage डिव्हाइस एकत्रितपणे वापरून संगणक बनवले जाते. संगणकाच्या प्रत्येक पार्ट मध्ये स्वतः चे एक वैशिष्ट्य असते. जसे, हार्ड डिस्क मध्ये डेटा साठवला जातो, माऊस द्वारे कर्सर नियंत्रित केला जातो.

    आजच्या लेखामध्ये आपण संगणकाच्या एक महत्वाच्या उपकरणाच्या प्रकारांची Types of Keyboard in Marathi माहिती (Information) घेणार आहोत. कीबोर्ड हे Desktop संगणकाचे हार्डवेअर इनपुट डिव्हाइस आहे. संगणकाला डेटा च्या स्वरूपात इनपुट देण्यासाठी कीबोर्ड वापरले जाते.

    कीबोर्ड चे काही प्रकार आहेत. मानवाने आपल्या सोयी- सुविधेनुसार कीबोर्ड मध्ये बदल केले आहेत, यांनाच वेगळ्या नावाने कीबोर्ड चे प्रकार म्हणतात.

कीबोर्ड चे प्रकार- Types of Keyboard in Marathi

   मी संगणक कीबोर्ड च्या काही महत्वाच्या प्रकारांची माहिती एकत्र केली आहे. किबोर्ड मध्ये वापरण्यात आलेले तंत्रज्ञान, कीबोर्ड ची रचना (Structure), कीबोर्ड चे उपयोग यानुसार कीबोर्ड चे प्रकार व त्यांची माहिती Types of Keyboard Information in Marathi मी खाली दिली आहे.

1) Mechanical Keyboard

    संगणकाच्या कीबोर्ड ला भौतिक (Physical) स्वरूपात बटन असले की ते Mechanical Keyboard असतात. हा कीबोर्ड चा सर्वाधिक लोकप्रिय प्रकार आहे. यात कीबोर्ड च्या बटन खाली Spring बसवलेली असते, जेणेकरून आपण बटन दाबले की ते परत त्याच्या स्थिर जागी येते, याला Spring Action Keyboard असेही म्हणतात.

    Mechanical कीबोर्ड मध्ये Electrical Circuit चा Concept वापरण्यात आला आहे, बटन दाबल्यावर सर्किट मधून करंट वाहतो, व त्यावरून कीबोर्ड चे प्रोसेसर Computer ला इनपुट पाठवते. Mechanical कीबोर्ड चा टिकाऊपणा बाकी च्या तुलनेत जास्त असतो आणि यांची अचूकता ही उत्कृष्ट असते. Typing करताना हा कीबोर्ड खूप आवाज उत्पन्न करतो, त्यामुळे हा या कीबोर्ड चा तोटा असू शकतो.

2) Membrane Keyboard

    बटन ला त्याच्या मूळ जागी आणण्यासाठी या कीबोर्ड मध्ये Pressure Pads वापरतात. हा कीबोर्ड सपाट पृष्ठभागावर स्थित असतो, रबर सारख्या पृष्ठभागावर अक्षरांची प्रिंटिंग केलेली असते, आपल्याला Typing करताना त्यावर फक्त हलके दाबावे लागते.

    Membrane कीबोर्ड मध्ये Mechanical कीबोर्ड सारखे वेगळे बटन नसतात, येथे एकच सपाट पृष्ठभाग असतो व त्यावर अक्षरे प्रिंट केलेली असतात. Mechanical च्या तुलनेत यांची अचूकता कमी असते. एकच पृष्ठभाग असल्याने Typing करताना बटन चा अंदाज येत नाही व चुका होतात. 

  Membrane Keyboard ची किंमत तुलनेने कमी असते आणि हे थोडे लवचिक असतात, त्यामुळे यांना बाजारात खूप पसंती आहे.

3) Wireless Keyboard

    याचा अर्थ नावातच आहे, Wireless म्हणजे वायर/ केबल नसलेले. Wireless Keyboard ला कॉम्पुटर सोबत Connect करण्यासाठी Bluetooth, IR Technology, Radio, Wi-Fi ही तंत्रज्ञान वापरले जातात. कीबोर्ड मध्ये Transmitter असते आणि Computer मध्ये Trans- receiver असते, जेणेकरून कीबोर्ड संगणकाला इनपुट पाठवतो.

    Wireless कीबोर्ड तुलनेने हलके व लहान आकाराचे असतात. आपण याना कोठेही सहजपणे नेऊ शकतो व Wireless असल्याने Computer पासून काही अंतरावरून ही चालवू शकतो. यात असलेले Bluetooth तंत्रज्ञानाने आपण हा कीबोर्ड उपकरण जसे Smartphone, TV, Tablet, यांच्या सोबत सुद्धा Connect करू शकतो. यांची किंमतही बाकी कीबोर्ड च्या तुलनेने कमी असते.

4) Multimedia Keyboard

    गाणे व मूवी प्रेमींसाठी हा कीबोर्ड डिजाईन करण्यात आला आहे. Multimedia Keyboard मध्ये Multimedia Buttons दिलेले असतात, जसे Play, Pause, Next, Previous, Volume Up and Down, Mute, ई. DJ Operator साठी हा कीबोर्ड उपयोगी ठरतो.

    Multimedia Buttons सोबत यात बाकी काही Shortcut Keys पण असतात. Browser Open करण्यासाठी या कीबोर्ड मध्ये एक बटन असते, Calculator उघडण्यासाठी सुद्धा एक Shortcut Key असते. आपल्याला जर Home थेटर चा आनंद घ्यायचा असेल तर Computer साठी हा कीबोर्ड नक्कीच वापरायला हवा.

5) Flexible Keyboard

    Flexible Keyboard मध्ये Silicone पदार्थ वापरला जातो, ज्यामुळे या Keyboard ला लवचिकता प्राप्त होते. Flexible कीबोर्ड आपण कसाही वाकू शकतो, पण याची घडी घालता येत नाही. या कीबोर्ड ला आपण हव्या त्या ठिकाणी हलवू शकतो.

    Flexible Keyboard खूप टिकाऊ असतो, कारण हा मोडत नाही आणि यावर पाण्याचा काहीही परिणाम होत नाही. Flexible कीबोर्ड हे Water Proof असतात. याची रचना अशी असते की यावर धूळ बसत नाही, त्यामुळे कीबोर्ड ला पुसण्याची गरजही लागत नाही.

6) Ergonomic Keyboard

    आपल्या हातांना Typing करताना खूप त्रास होतो. खूप वेळ सतत Typing केल्याने मनगटाला आजार होतो. हा त्रास कमी करण्यासाठी हे Ergonomic Keyboard बनवलेले आहेत. आपल्या हाताच्या सोयी नुसार याची डिजाईन बनवलेली आहे.

    चित्रात दाखवल्या प्रमाणे याची डिजाईन असते. यांचा वापर केल्याने आपल्या बोटांचा व मनगटावर येणारा ताण कमी होतो. याची किंमत तुलनेने जरा जास्त असते. Ergonomic कीबोर्ड ने शरीरावरील ताण कमी होतो व आपल्याला वेगाने Typing करायला सोपे जाते.

7) Gaming Keyboard

    Computer वर गेम खेळताना उत्कृष्ट अनुभव घेण्यासाठी हे Gaming Keyboards वापरले जातात. गेम खेळणारे लोक कीबोर्ड वरील W, S, D आणि A हे बटन सर्वात जास्त वापरतात. त्यामुळे या कीबोर्ड ची टिकाऊ क्षमता वाढवण्यात आलेली आहे.

    यात Quick Key Response कडे जास्त लक्ष दिले जाते, ज्यामुळे आपण बटन दाबले की क्षणात आपल्याला आउटपुट मिळते. Gaming Keyboard मध्ये Keys ला लाईट लावलेली असते. जास्त वैशिष्ट्ये असल्याने यांची किंमत देखील खूप जास्त असते.

8) Virtual Keyboard

    आपल्याला हे माहीत आहे की कीबोर्ड हे हार्डवेअर उपकरण आहे, पण Virtual Keyboard याला अपवाद आहे. Virtual Keyboard हे एक सॉफ्टवेअर असते. हे स्मार्टफोन, टॅबलेट, व विंडोज मध्ये इंस्टॉल केले जाऊ शकते.

    हे कीबोर्ड टच स्क्रीनवर असते. बटन दाबायचे असल्यावर आपल्याला माऊस च्या साहाय्याने तेथे क्लिक करावे लागते, आणि स्मार्टफोन किंवा टॅबलेट असेल तर स्क्रीनवर टच करावे लागते. आपल्याला काम असल्यास आपण ते स्क्रीनवर आणू शकतो आणि काम झाल्यास Virtual Keyboard ला हटवू शकतो.

9) Vertical Keyboard

    Virtual Keyboard हा Ergonomic कीबोर्ड च असतो. आपल्या नैसर्गिक पध्दतीत बसून आपण हे कीबोर्ड चालवू शकतो. शारीरिक तणाव कमी करण्यासाठी हे कीबोर्ड बनवले आहेत.

    यात 3D Concept वापरला गेलेला आहे. बाकी सर्व कीबोर्ड च्या तुलनेने हे खूप महाग असतात. ज्या व्यक्तींना जास्त Typing चे काम असते त्यांनी हा कीबोर्ड वापरला पाहिजे.

10) Projection Keyboard

    Projection Keyboard मध्ये Advanced Technology अमलात आणली गेली आहे. या कीबोर्ड मध्ये लेजर वापरले जातात. सिनेमा थेटर मध्ये जशी लाईट पडद्यावर फोकस करतात त्याप्रमाणे या कीबोर्ड मध्ये लाईट एक टेबल वर फोकस करतात व तेथे टेबल वर कीबोर्ड चे Keys दिसतात.

    Projection Keyboard ला संगणकाशी कनेक्ट करण्यासाठी Wireless Technology वापरतात, जसे Bluetooth आणि Wi-Fi. भविष्यात या कीबोर्ड चा वापर खूप वाढणार आहे. यात बटन दाबायची गरज नाही फक्त बटन च्या ठिकाणी बोट ठेवायचे आहे.

    यांची किंमत अफाट असते, हा कीबोर्ड वापरण्याचा तोटा म्हणजे, कीबोर्ड सारखा अनुभव येत नाही. आपल्याला या नवीन तंत्रज्ञानाचा अनुभव घ्यायचा असेल तर नक्कीच वापरून पहा.

निष्कर्ष-

    संगणक माऊस चे प्रकार व त्यांची माहिती Keyboard Types Information in Marathi, आता मी तुम्हाला दिलेली आहे आणि मला आशा आहे की तुम्हाला सर्व माहिती चांगल्याप्रकारे समजली असेल.

  आपणास जर काही अडचण असेल तर कंमेंट द्वारे विचारायला विसरू नका आणि या विषयावर अधिक माहितीसाठी ब्लॉगला वारंवार भेट देत राहा.

   आपणास कीबोर्ड चे 10 प्रकार व त्यांची माहिती- Types of Keyboard in Marathi  हा लेख कसा वाटला, मला कंमेंट द्वारे नक्की कळवा.

Leave a Comment