SBI Balance Check कसा करायचा, जाणून घ्या 9 सोप्या पद्धती

WhatsApp Group Join Group

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे. State Bank of India हि भारत सरकारच्या मालकीची आहे आणि ही भारतातील सर्वात जुनी बँक आहे. बँक ऑफ बंगाल, बँक ऑफ बॉम्बे, बँक ऑफ मद्रास आणि बँक ऑफ बरार या चार सरकारी बँकांचे राष्ट्रीयकरण करून 1 जुलै 1955 रोजी SBI ची स्थापना करण्यात आली. SBI चे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. या बँकेच्या 22,000 हून अधिक शाखा आहेत आणि 65,000 हून अधिक ATM आहेत. SBI ही भारतातील सर्वात मोठी बँक तर आहेच सोबतच, ही जगातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक आहे.

आजच्या लेखात आपण SBI Balance Check कसा करायचा, याबद्दल जाणून घेणार आहोत. पूर्वीच्या काळी लोकांना बँकेच्या शाखेत जाऊन त्यांच्या SBI Bank Balance Check करण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत होते. परंतु जेव्हापासून लोकांकडे मोबाईल फोन आणि इंटरनेट उपलब्ध आहे, तेव्हापासून तुम्ही घरी बसून अनेक प्रकारे तुमच्या SBI Bank Account Balance तपासू शकता. या पोस्टमध्ये मी तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातील शिल्लक तपासण्याचे 9 सोपे मार्ग सांगणार आहे. त्यापैकी कोणतीही एक पद्धत वापरून तुम्ही सहजपणे तुमचा SBI Balance Check करू शकता.

SBI Balance Check कसा करायचा, जाणून घ्या 9 सोप्या पद्धती

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या ग्राहकांना खात्याशी संबंधित सर्व सेवा पुरवते. जसे की तुम्ही खात्यातील रक्कम तपासू शकता, दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता, ऑनलाईन रिचार्ज करू शकता, खरेदी करू शकता किंवा बिले भरू शकता. SBI खात्याच्या अनेक सुविधा केवळ टोल फ्री क्रमांकाच्या मदतीने मिळू शकतात. या लेखात मी तुम्हाला SBI SBI Balance Check करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सांगणार आहे. तर चला जाणून घेऊयात SBI Balance Check करण्याच्या काही पद्धती –

1) SBI Balance Check Using Missed Call Service

SBI Bank Account Balance Check करण्यासाठी बँकेने अनेक ऑनलाईन आणि ऑफलाईन सुविधा दिलेल्या आहेत. यात सर्वात पहिले आपण मोबाईल नंबर वरती Missed Call करून SBI Balance Check कसा करायचा हे पाहुयात. यासाठी SBI ने मोबाईल नंबर दिलेला आहे. SBI Missed Call Service वापरण्यासाठी नोंदणी करावी लागते, ते कसे करायचे हे खाली दिले आहे.

 • SBI Miss Call Banking Service नोंदणी करण्यासाठी आपल्याला बँक अकाउंटला जोडलेल्या मोबाईल नंबर वरून एक SMS पाठवायचा आहे.
 • मेसेज पाठवण्यासाठी SMS Box मध्ये “REG<SPACE>Account Number” असा मेसेज लिहायचा आहे.
 • हा मेसेज “09223488888” नंबर वरती Send करायचा आहे.
 • SMS Send केल्यावर थोड्याच वेळाने तुम्हाला SMS Banking Service Activate झाल्याचा मेसेज येईल.
 • आता Balance Check करण्यासाठी फक्त “09223766666” यावर मिस कॉल करायचा आहे. काही सेकंदात तुमच्या Registered Mobile Number वरती मेसेज येईल त्यात तुमचा SBI Balance दिलेला असेल.

2) SBI Balance Check Using SMS Service

नोंदीकृत मोबाईल नंबर वरून SMS पाठून तुम्ही SBI Balance चेक करू शकता. जो नंबर मिसकॉल साठी आहे तोच SMS Service साठी आहे. SMS सर्व्हिस वापरून बँक बॅलन्स चेक करण्यासाठी 9223766666 या नंबर वरती SMS पाठवायचा आहे. त्यासाठी खालील स्टेप्स पाहा.

 • आपल्या मोबाईल मधील SMS Box ओपन करा.
 • तीन अक्षरांचा “BAL” असा मेसेज लिहा.
 • नोंदणी केलेल्या मोबाईल नंबर वरून “9223766666” या नंबर वरती मेसेज Send करा.
 • लगेच तुमच्या मोबाईल वरती मेसेज येईल त्यात Bank Balance बद्दल सांगितले जाईल.

3) SBI Balance Check Using Net Banking Service

जर तुम्ही तुमच्या खात्यासाठी Net Banking ची सुविधा घेतली असेल, तर तुम्ही एसबीआय च्या वेबसाइटवर लॉग इन करून तुमचा Bank Balance तपासू शकता. तुम्ही तुमच्या SBI नेट बँकिंग लॉगिन आयडी आणि पासवर्डने वेबसाइटवर Login करून तुमच्या SBI नेट बँकिंग खात्यात प्रवेश करू शकता. Net Banking द्वारे SBI Balance कसा चेक करायचा त्यासाठी खालील स्टेप्स पाहा.

 • सर्वात आधी स्टेट बँकेच्या वेबसाईट वरती लॉगिन करा – https://www.onlinesbi.com/
 • लॉगिन केल्यावर “My Accounts” सेक्शन वरती जावे.
 • My Accounts मधून “View Account Balance” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
 • आता तुम्हाला तुमचा SBI Bank Balance दाखवला जाईल.

4) SBI Balance Check Using USSD Code Service

SBI USSD (Unstructured Supplementary Service Data) कोड हा एक 4 ते 6 अंकीचा कोड आहे जो आपल्याला आपल्या मोबाइल फोनमधून, इंटरनेट कनेक्शनशिवाय विविध बँकिंग सेवा वापरण्यास सक्षम करतो. विशिष्ट USSD कोड डायल करून, आपण आपल्या खात्याचा बॅलन्स तपासू शकता, मिनी स्टेटमेंट प्राप्त करू शकता, पैसे ट्रान्सफर करू शकता, चेकबुक मागू शकता आणि बरेच काही करू शकता. SBI USSD कोड द्वारे बँक बॅलन्स चेक करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

 • सर्वात आपल्या मोबाइल फोनवरून *595# डायल करा.
 • पुढे आपल्या खात्याची यूजर आयडी प्रविष्ट करा.
 • आता मेनू येईल त्यातील 1 किंवा 2 पर्याय निवडा.
 • पुढच्या स्टेप ला आपला MPIN प्रविष्ट करा.
 • शेवटी “Send” वर टॅप करा.

5) SBI Balance Check Using UPI Service

भारत सरकारने मोबाईल च्या मदतीने बँक खात्याशी संबंधित सेवांसाठी UPI प्रणाली बनवली आहे. आपण Google Pay, PhonePe, Paytm, Amazon Pay, आणि इतर अनेक UPI Apps वापरून SBI Balance Check करू शकता. तुम्ही तुमच्या मोबाइलवर कोणतेही UPI App इन्स्टॉल करू शकता आणि तुमच्या खात्याशी लिंक करू शकता. यानंतर, त्या App मदतीने तुम्ही जेव्हा हवे तेव्हा तुमच्या खात्यातील शिल्लक तपासू शकता. तुम्ही पैसे पाठवू आणि मिळवू शकता. त्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

 • आपल्या मोबाईल वरील UPI App ओपन करा.
 • आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून आपल्या बँक खात्याशी कनेक्ट करा.
 • पुढे “Check Bank Balance” पर्याय निवडा.
 • आता आपले बँक अकाउंट निवडा.
 • आपला UPI PIN किंवा MPIN प्रविष्ट करा.
 • आणि “Check Balance” बटण दाबा.

6) SBI Balance Check Using YONO SBI App

स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांना मोबाईलद्वारे बँक खात्याशी संबंधित सेवा देण्यासाठी YONO App बनवलेले आहे. त्याच्या मदतीने तुम्ही फक्त तुमच्या खात्यातील SBI Balance Check करण्यासोबत संपूर्ण पासबुक देखील पाहू शकता. ज्यामध्ये तुमच्या खात्यातील सर्व व्यवहारांचा इतिहास आणि वैयक्तिक तपशील सुद्धा उपलब्ध असते. YONO App वापरून SBI Balance Check करण्यासाठी पुढील स्टेप्स पाहा.

 • सर्वात आधी Play Store किंवा App Store वरून YONO SBI App डाउनलोड करून घ्या.
 • YONO SBI App वापरण्यासाठी यावर नोंदणी करा आणि Username आणि Password टाकून लॉगिन करा.
 • YONO App वरती लॉगिन झाल्यावर आपल्याला अनेक पर्याय दिसतील त्यातील “View Balance” यावर क्लिक करा.
 • यानंतर तुमच्या बँक खात्यात जो काही Balance असेल तो बघायला मिळेल.

7) SBI Balance Check Using WhatsApp Banking

SBI ने WhatsApp बँकिंग ची सुविधा सुद्धा दिली आहे. तुम्ही SBI WhatsApp Banking सेवेद्वारे बँक बॅलन्स मिळवू शकता. यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

 • सर्वप्रथम, तुमच्या मोबाइलवर +919022690226 सेव करा, यावर WhatsApp द्वारे नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून ‘Hi’ असा मेसेज पाठवा.
 • नंतर चॅटबॉटने दिलेल्या सूचनांचे अनुसरण करा आणि “Check Account Balance” हा पर्याय निवडा.
 • आता तुमच्या SBI खात्यातील बॅलन्स ची माहिती WhatsApp मध्ये दिसेल.

8) SBI Balance Check Using ATM Card

ATM Card द्वारे बँक बॅलन्स तपासण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या कोणत्याही एटीएम मशीनमध्ये जावे लागेल. यानंतर तुम्हाला खाली नमूद केलेल्या सर्व स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

 • बँक बॅलन्स तपासण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला तुमचे एसबीआय बँकेचे एटीएम कार्ड एटीएम मशीनमध्ये टाकायचे आहे.
 • एटीएम कार्ड टाकल्यानंतर, तुम्हाला “PRESS HERE” चे बटन दाबावे.
 • यानंतर, जर तुमचे बँक खाते बचत खाते असेल तर “SAVING” च्या पुढील बटणावर क्लिक करा.
 • आता तुम्हाला “BALANCE INQ” च्या पुढील बटणावर क्लिक करावे लागेल.
 • या बटणावर क्लिक करताच. तुमच्या खात्यातील शिल्लक रक्कम एटीएम मशीनच्या डिस्प्लेवर दर्शविली जाते.

9) SBI Balance Check Using Passbook

जेव्हा आपण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये किंवा कोणत्याही बँकेत बँक खाते उघडतो तेव्हा आपल्याला पासबुक दिले जाते. आपण त्या पासबुकमध्ये प्रत्येक व्यवहाराची माहिती ठेऊ शकतो. आपण पासबुकद्वारे Bank Balance तपासू शकतो आणि पासबुक नोंदींद्वारे डेबिट आणि क्रेडिट झाल्याच्या नोंदी पाहू शकतो. यासाठी वेळोवेळी आपल्याला पासबुक प्रिंट करण्यासाठी बँकेत जावे लागेल. जर तुम्हाला बँकेच्या पासबुकद्वारे तुमच्या खात्यातील बॅलन्स ची माहिती मिळवायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला प्रथम SBI बँकेच्या शाखेत जाऊन तुमचे पासबुक प्रिंट करून घ्यावे लागेल.

निष्कर्ष –

वरती सांगितल्याप्रमाणे SBI बँक खात्यातील बॅलन्स तपासण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणताही मार्ग निवडू शकता. बॅलन्स तपासताना एक गोस्ट लक्षात ठेवा कि तुम्ही जी प्रक्रिया करणार ती बँकेला नोंदणी केलेल्या मोबाईल नंबर वरूनच करावी. जर तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याला लिंक नसेल तर तो करून घेणे गरजेचे आहे त्याशिवाय तुम्हाला बँकेच्या महत्वाच्या सेवांचा लाभ घेता येणार नाही. तर मला वाटते कि SBI Balance Check कसा करायचा हे तुम्हाला सर्वाना समजले असेल.

आज मी तुम्हाला SBI Balance Check करण्याच्या 9 विविध पद्धती सांगितल्या आहेत, जर तुम्हाला हि माहिती महत्वाची वाटली असेल तर कृपया ही माहिती तुमच्या मित्रपरिवार, नातेवाईकांना शेअर करा. जेणेकरून प्रत्येकाला या लेखाद्वारे मदत करता येईल. SBI Balance Check करण्याबाबत तुम्हाला काही प्रश्न असल्यास, तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. मी लवकरात लवकर तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. याप्रकारच्या अधिक माहितीसाठी या वेबसाईट वरती पुन्हा नक्की या.

Leave a Comment