QR Code म्हणजे काय, आणि याचे प्रकार कोणते?

WhatsApp Group Join Group

सध्याच्या काळात QR Code सर्व ठिकाणी वापरले जात आहेत. आपण दुकानावर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी तेथील QR Code स्कॅन करतो आणि पेमेंट करतो. आज QR Code (QR Code in Marathi) चा वापर अनेक ठिकाणी आणि अनेक क्षेत्रात केला जातो. QR Code हा लहान, चौरस-आकाराचा काळ्या रंगाचा असतो. QR Code स्कॅन केल्यावर आपण त्यात कोड केलेल्या ठिकाणी जातो, ती वेबसाईट असू शकते किंवा एखाद्याचा इंस्टाग्राम अकाउंट किंवा व्हाट्सएप्प अकाउंट असू शकते.

ऑनलाईन पेमेंट App जसे Google Pay, Phone Pay वरून QR Code स्कॅन केला तर त्या संबंधित व्यक्तीला पेमेंट सुद्धा करता येते, इंस्टाग्राम प्रोफाइल चा QR मिळतो तो स्कॅन करून डायरेक्ट एखाद्याच्या प्रोफाइल वरती जाता येते. QR कोड चा उपयोग फक्त ऑनलाईन पेमेंट मध्ये नाही तर अनेक ठिकाणी केला जातो जसे तुम्ही पाहिले असेल कि बिस्कीट च्या पुड्यावर, कोणत्याही विकत घेतलेल्या वस्तूवर, जाहिरातींमध्ये, ई. याचा वापर संबंधित वस्तू बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी सुद्धा होतो.

QR कोड चा आजचा वाढता वापर पाहता याबद्दल माहिती असणे तुम्हा सर्वांसाठी आवश्यक आहे, त्यामुळे आजच्या पोस्टमध्ये आपण QR कोड म्हणजे काय? (QR Code in Marathi) , QR कोड चे प्रकार (Types of QR Code in Marathi) , QR कोड कसा बनवायचा आणि याचा इतिहास, उपयोग अशी सर्व माहिती पाहणार आहोत. तरी पोस्ट शेवटपर्यंत वाचावी अशी विनंती!

QR Code म्हणजे काय? (QR Code in Marathi)

QR Code म्हणजे “Quick Response Code” हा लहान असलेला द्विमितीय बारकोड आहे जो स्मार्टफोन किंवा बारकोड स्कॅनरद्वारे रीड केला जातो. या कोडमध्ये काळ्या आणि पांढऱ्या चौरसांच्या चौरस ग्रिडचा समावेश केलेला असतो. यांची रचना एका विशिष्ट पॅटर्नमध्ये केली जाते. QR (QR Code in Marathi) कोड मोठ्या प्रमाणात माहिती संचयित करू शकतात, जसे की वेबसाइट ची URL, संपर्क माहिती किंवा एखाद्या उत्पादनाचा तपशील. जेंव्हा आपण त्यावर स्कॅन करता त्यावेळी तुम्ही आपोआप त्या ठिकाणी नेले जाता.

क्यूआर कोडचा शोध 1994 मध्ये डेन्सो वेव्ह (Denso Wave) नावाच्या जपानी कंपनीने लावला होता. कंपनीला त्यांच्या उत्पादन प्रक्रियेची माहिती सहज लोकांपर्यंत जावी यासाठी काहीतरी सोपा पर्याय हवा होता आणि याच कारणामुळे म्हणून त्यांनी एक उपाय म्हणून QR कोड विकसित केला. सुरुवातीला, QR कोड प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्रात वापरले जात होते, परंतु त्यांनी लवकरच माहिती मिळवण्याचा मार्ग म्हणून ग्राहक बाजारपेठेत प्रवेश केला.

QR Code कसे कार्य करतात? (Working of QR Code in Marathi)

आता तुम्हाला आश्चर्य वाटत असेल कि येवढुश्या छोट्या बॉक्स मध्ये डेटा कसा साठवला जाऊ शकतो, तर त्याचे उत्तर तुम्हाला येथे मिळेल. तर QR कोड मध्ये देता प्रिंट करण्यासाठी काळ्या आणि पांढर्‍या चौरसांचा वापर करतात. QR कोड मधील प्रत्येक चौरस हा बायनरी कोड दर्शवतो. बायनरी कोड हि कॉम्पुटर ची भाषा आहे, कॉम्पुटर मध्ये डेटा बायनरी स्वरूपात साठवून ठेवला जातो.

QR कोडमधील काळा चौरस हा 1 दर्शवतो आणि पांढरा चौरस 0 दर्शवतो. या 0 आणि 1 ची रचना मोबाईल कॅमेरा किंवा बारकोड स्कॅनर द्वारे डिकोड केली जाते. QR कोडमध्ये विविध प्रकारचा डेटा स्टोर केला जाऊ शकतो जसे, टेक्स्ट, URL, Contact Information, आणि फोटो आणि विडिओ सुद्धा. यामध्ये किती डेटा साठवला जाऊ शकतो हे याच्या आकार अवलंबून असते.

सामान्यतः मोठ्या आकाराच्या QR कोड (QR Code in Marathi) मध्ये जास्त डेटा स्टोर केला जाऊ शकतो, छोट्या QR कोड च्या तुलनेत. QR कोड बनवायचे सुद्धा खूप सोपे आहे ते कसे करायचे हे आपण पुढच्या पोस्टमध्ये पाहणार आहोतच. तर मला वाटते QR कोड कसे कार्य करतात हे आता तुम्हाला समजले असेल. आता आपण QR कोड चे प्रकार म्हणजे Types पाहुयात.

QR Code चे प्रकार (Types of QR Code)

आपल्याला माहित नसेल पण QR कोड (QR Code in Marathi) चे विविध प्रकार असतात. तर चला आता आपण याचे मुख्य प्रकार पाहुयात.

1) Static QR Code

Static QR कोड हा QR कोडचा सर्वात सामान्य प्रकार आहे. हे Fixed कोड असतात म्हणजे यात एकदा टाकलेली माहिती पुन्हा बदलता येत नाही. या प्रकारचा QR कोड वेबसाइट URL किंवा संपर्क तपशील यासारखी मूलभूत माहिती प्रदर्शित करण्यासाठी वापरला जातो. Static QR कोड जाहिराती, व्यवसाय कार्ड किंवा मूलभूत माहिती शेअर करणे यासाठी वापरला जातो.

2) Dynamic QR Code

Dynamic QR कोड Static QR कोडपेक्षा अधिक Advanced असतात. ते तुम्हाला कोडमध्ये असलेली माहिती कधीही गरज लागल्यास बदलण्याची परवानगी देतात. याचा अर्थ तुम्ही कोडमध्ये असलेली माहिती पुन्हा मुद्रित न करता अपडेट करू शकता. डायनॅमिक QR कोड सामान्यतः विपणन आणि जाहिरात मोहिमा, उत्पादन माहिती आणि इव्हेंट नोंदणीसाठी वापरले जातात. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर Dynamic QR कोड आपण कधीही अपडेट करू शकतो, Static QR Code अपडेट करता येत नाही तो बदलावा लागतो.

QR Code चे उपयोग (Uses of QR Code)

QR कोड हे द्विमितीय बारकोड आहेत जे अलिकडच्या वर्षांत खूप लोकप्रिय झाले आहेत. माहिती जलद आणि सहज ऍक्सेस करण्यासाठी ते स्मार्टफोन किंवा QR कोड रीडरने स्कॅन केले जाऊ शकतात. आता आपण QR कोड चे काही महत्वाचे उपयोग पाहुयात.

1) मार्केटिंग आणि जाहिरातीमध्ये –

मार्केटिंग आणि जाहिरातीच्या क्षेत्रात QR कोड मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. ते युजर्सला विशिष्ट वेबपेज, सोशल मीडिया खाते किंवा उत्पादन कंपनीच्या वेबसाइटवर नेण्यासाठी वापरले जातात. QR कोड स्कॅन करून, वापरकर्ते ऑफर, कूपन किंवा सवलती Access करू शकतात. आपण पहिले असेल कि आपण विकत घेत असलेल्या अनेक वस्तूंच्या पॅकेट वरती हे कोड लावलेले असतात, अश्या प्रकारे मार्केटिंग आणि जाहिरातीच्या क्षेत्रात हे कोड वापरले जातात.

2) उत्पादनाच्या लेबलिंगमध्ये –

ग्राहकांना उत्पादनाविषयी अधिक माहिती देण्यासाठी उत्पादन लेबलिंग आणि पॅकेजिंगमध्ये QR कोड वापरले जातात. उदाहरणार्थ, खाद्य पदार्थ्यांच्या कव्हर वरती QR कोड असतात जे त्यातील पौष्टिक घटकांबद्दल माहिती देतात, तर तंत्रज्ञान प्रॉडक्टमधील QR कोड उत्पादन पुस्तिका आणि वॉरंटी कार्ड ची माहिती देतात.

3) ऑनलाईन पेमेंट सिस्टममध्ये –

पेमेंट सिस्टीममध्ये QR कोडचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. रोख किंवा कार्डांची गरज न पडता, जलद आणि सहज पेमेंट करण्यासाठी हे स्कॅन करून पेमेंट केले जात आहे. QR कोड सामान्यतः मोबाइल पेमेंट सिस्टममध्ये वापरले जातात, जसे की आपल्याकडील गूगल पे, फोन पे, ऍमेझॉन पे, ई. आजकाल सगळ्या दुकानांमध्ये QR कोड असतात ते याच कारणासाठी म्हणजे ज्याला पेमेंट करायचे आहे तो स्कॅन करून सहजपणे पैसे पाठवू शकतात.

4) माहिती शेअरिंगमध्ये –

माहिती जलद आणि सहज शेअर करण्यासाठी QR कोडचा वापर केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, व्यवसाय कार्डमध्ये संपर्क माहिती प्रदान करणारे QR कोड असू शकतात, तर संग्रहालये आणि गॅलरीमध्ये QR कोड असू शकतात जे प्रदर्शनांबद्दल अधिक माहिती देतात.

निष्कर्ष

आजच्या QR Code in Marathi, या पोस्टमध्ये आपण पहिले कि QR Code म्हणजे काय आहे आणि QR Code चे प्रकार आहेत, कार्य कसे करतात, उपयोग. आज मोठ्या प्रमाणात QR Code वापरले जात आहेत, तुम्हालाही QR Code तयार करायचा असेल तर ते मी पुढच्या पोस्टमध्ये सांगणार आहे तर ती पोस्ट नक्की वाचा.

आमचा, QR Code म्हणजे काय, QR Code चे प्रकार, QR Code in Marathi, हा लेख तुम्हाला कसा वाटला, ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि (QR Code in Marathi) आवडला असेल सोशल मीडियावर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. अश्याच प्रकारच्या अधिक माहितीसाठी मराठी ऑनलाईन या वेबसाईट ला पुन्हा भेट नक्की द्या.

Leave a Comment