ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म म्हणजे काय, जाणून घ्या संपूर्ण माहिती

पूर्वीच्या काळी सिनेमा पाहण्यासाठी लोकांकडे Cathode Ray Tube च्या TV होत्या, त्या काळापासून मनोरंजनाचे एक वेगळे पर्व सुरू झाले. सिनेमा रिलीज झाल्यावर तो सर्वात आधी चित्रपट गृह (Theatre) मध्ये दर्शवला जायचा व त्यानंतर काही महिन्यांनी किंवा वर्षाने TV वर यायचा किंवा CD/DVD मध्ये बाजारात विकत घेता येत असे, याप्रमाणे अनेक वर्षे चालत राहिले. TV मध्ये नवीन LCD, LED तंत्रज्ञान आले व आत्ताच्या High Quality च्या TV वापरणे सुरू झाले.

WhatsApp Group Join Group

दुसऱ्या बाजूने इंटरनेट आणि कॉम्पुटर चा विकास जोरात सुरू होताच. विविध अँप्स, वेबसाईट यांचा निर्माण केला जात होता. त्यानंतर मोबाईल आले, व मोबाईल ने मनोरंजनाचे माध्यम पूर्णपणे बदलून टाकले. सिनेमा, मालिका मोबाईलवर पाहणे लोकांना सोयीस्कर वाटू लागले. मनोरंजन क्षेत्रातील मोबाईल ची वेगाने वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन काही कंपन्यांनी असे Apps बनवले ज्यात त्यांनी सिनेमा, सिरीयल, वेब सिरीज, उपलब्ध करून दिले, या खास प्रकारच्या Apps ला OTT प्लॅटफॉर्म असे म्हणतात.

आजच्या या लेखामध्ये आपण OTT Platform ची माहिती, Information समजून घेणार आहोत. या लेखामध्ये आपण पाहुत की OTT म्हणजे काय असते, OTT चे प्रकार, OTT चे फायदे व भारतातील काही लोकप्रिय OTT प्लेटफॉर्मस ची नावे. तर चला जास्त वेळ न घालवता मुख्य महितीकडे वळूयात.

ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म म्हणजे काय, जाणून घ्या संपूर्ण माहिती (OTT in Marathi)

OTT चा फूल फॉर्म Over The Top असा होतो. OTT अँप्स इंटरनेट च्या सहाय्याने वापरकर्त्यांना Video आणि इतर सोयी सुविधा प्रदान करतात. OTT शब्दाचा उपयोग Video on Demand Platforms साठी केला जातो. आजही लोकप्रियतेमुळे OTT Platforms ची संख्या सातत्याने वाढत चालली आहे.

    इंटरनेट च्या साहाय्याने OTT कंटेंट जसे विडिओ, वेब सिरीज, मुव्हीज, उपलब्ध करून देणाऱ्या Apps ला OTT प्लॅटफॉर्म असे म्हणतात.

अमेरिकेत OTT प्लॅटफॉर्म ची लोकप्रियता खूप आहे. भारतातही आता हे खूप लोकप्रिय झाले आहेत. आत्ताच्या लॉकडाउन च्या काळात लोकांचा कल OTT in Marathi Platform कडे जास्त वाढला आहे. OTT प्लॅटफॉर्म व आपण लोकप्रिय वेब सिरीज, चित्रपट पाहू शकतो, या मोबदल्यात OTT प्लॅटफॉर्म काही पैसे घेतात.

OTT Apps आता इतके लोकप्रिय झाले आहेत की वेब सिरीज व चित्रपट सरळ त्या App वरच लाँच केले जातात. आपल्याला जर तो कंटेंट म्हणजे चित्रपट किंवा वेब सिरीज पाहिजे असेल तर ते विकत घ्यावे लागते ओटीटी ॲप्स वरून कोणतीही गोष्ट आपण विकत घेतल्या शिवाय पाहू शकत नाहीत.

ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म चे प्रकार (Types of OTT in Marathi)

  ओटीटी प्लॅटफॉर्म चे तीन प्रकार पडतात ते खालीलप्रमाणे-

1) Transactional Video on Demand (TVOD)

OTT Platform च्या या TVOD सर्व्हिस मध्ये सुविधा दिली जाते की वापरकर्त्यांना त्याच्या आवडीचा Television Show किंवा Movie एका वेळेस पाहायचा असल्यास वापरकर्ता त्याला रेंट वर विकत घेऊ शकतो. Apple I Tunes याचे सर्वोत्तम उदाहरण आहे.

2) Subscription Video on Demand (SVOD)

वापरकर्त्यांना जर Video Streaming Content पहायचे असेल तर हे Subscription घ्यावे लागते. Subscription घेण्यासाठी वापरकर्त्याला काही पैसे भरावे लागतात. या प्रकारचे OTT Platforms भारतात खूप लोकप्रिय आहेत. Netflix, Amazon Prime ही याची उदाहरणे आहेत.

3) Advertising Video on Demand (AVOD)

यामध्ये वापरकर्ते फुकट मध्ये OTT Content पाहू शकतात, पण या बदल्यात त्यांना Video चालू असताना मध्ये येणाऱ्या छोट्या-छोट्या जाहिराती पहाव्या लागतात. Video च्या मध्ये दर्शवल्या जाणाऱ्या जाहिरातींना Video Ads असेही म्हणतात. लोकप्रिय असलेले यूट्यूब हे याचे उदाहरण आहे.

OTT चा फूल फॉर्म (OTT Full Form in Marathi)

 OTT चा फूल फॉर्म Over The Top असा होतो.

OTT Full Form Over The Top
OTT मराठी अर्थ सर्वात वर

OTT Platform आणि Traditional Platform मध्ये काय फरक आहे?


OTT प्लॅटफॉर्म आणि Traditional म्हणजे पारंपरिक प्लॅटफॉर्म यांच्यात खालील प्रमुख फरक आहेत –

 • Delivery : OTT प्लॅटफॉर्म डिजिटल माध्यमांद्वारे सामग्री वितरित करतात, तर पारंपारिक प्लॅटफॉर्म केबल, उपग्रह, किंवा एअरवेव्ह यांसारख्या पारंपारिक माध्यमांद्वारे वितरण करतात.
 • Content : OTT प्लॅटफॉर्म विविध प्रकारची सामग्री देतात, ज्यात चित्रपट, टीव्ही शो, व्हिडिओ गेम, संगीत, आणि इतर प्रकारची सामग्री समाविष्ट असते. पारंपारिक प्लॅटफॉर्म प्रामुख्याने चित्रपट आणि टीव्ही शो वितरित करतात.
 • Price : OTT प्लॅटफॉर्म सदस्यता-आधारित असतात, तर पारंपारिक प्लॅटफॉर्म सहसा वापरकर्त्यांना मासिक किंवा वार्षिक शुल्क आकारतात.

OTT प्लॅटफॉर्मची लोकप्रियता वाढत आहे कारण यामध्ये अधिक स्वातंत्र्य, सुविधा, आणि कमी किंमतीत content उपलब्ध आहे. तर चला OTT चे फायदे पाहुयात.

ओटीटी (OTT) चे फायदे (Advantages of OTT in Marathi)

ओटीटीच्या फायद्यामुळे आज हे खूप लोकप्रिय झाले आहेत. दिवसेंदिवस यांच्या Subscribers ची संख्या वाढत चालली आहे आहे, याचे मुख्य कारण म्हणजे OTT चे Advantages. तर चला OTT चे फायदे जाणून घेऊयात.

1) कोणत्याही वेळेस पाहण्याची सोय-

ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपण व्हिडीओ कन्टेन्ट कधीही पाहू शकतो टीव्हीमध्ये ठराविक वेळेत मूवी किंवा सिरीयल दाखवली जाते परंतु ओटी मध्ये असे नसते. आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मूवी, वेब सिरीज म्हणजेच कोणतेही व्हिडीओ कंटेंट पाहू शकतो.

2) एकापेक्षा जास्त वेळेस पाहण्याची सोय-

ओटीटी ॲप वर आपण एक चित्रपट वेब सिरीज असंख्य वेळा पाहू शकतो. टीव्ही मध्ये फक्त प्रसारण वेळेत पाहता येते. पुन्हा-पुन्हा पाहण्याची सोय टीव्हीमध्ये नसते. ओटीटी प्लॅटफॉर्म वर युजर व्हिडिओ कंटेटला केव्हाही आणि कधीही पाहू शकतो. एकावेळेस संपूर्ण पाण्याचीही आवश्यकता नाही, व्हिडिओला मध्ये करून ठेवण्याची सोय सुद्धा ओटीपी प्लॅटफॉर्म वर दिलेली आहे.

3) जाहिरात मुक्त चित्रपट पाहण्याची सोय-

ओटीटी ॲप्स लोकप्रिय होण्याचे हेच मोठे कारण असावे. टीव्ही पाहताना अनुभवले असेल की जवळजवळ अर्धा वेळ जाहिरात च चालत असते, त्यामुळे मनोरंजनाचा आनंद नाहीसा होतो. ओटीटी मध्ये एकही जाहिरात तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही यामुळे युजरला व ओटीटीवर एक चांगला अनुभव मिळतो.

4) विविध डिव्हाइस वर पाहण्याची सोय-

ओटीटी सुविधा फक्त स्मार्टफोन पर्यंत मर्यादित राहिलेली नाही. आता बाजारात स्मार्ट टीव्ही आल्या आहेत यात ओटीटी ची सुविधा देण्यात आलेली आहे. त्यामुळे आपण मोठ्या स्क्रीनवर OTT कंटेंट चा आनंद घेऊ शकतो लॅपटॉप आणि डेस्कटॉप कॉम्प्युटर मध्ये ही ओटीटी कंटेंट पाहण्याची सोय उपलब्ध आहे.

5) व्हिडिओ डाऊनलोड करून ठेवण्याची सोय-

OTT वरील व्हिडीओ डाऊनलोड करण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. आपण हवा तो व्हिडिओ डाऊनलोड करू शकता व वाटेल त्यावेळेस पाहू शकता. यामुळे इंटरनेट सुविधा उपलब्ध नसेल तरीही आपण मनोरंजनाचा आनंद घेऊ शकता व OTT वरील विडिओ पाहू शकता.

भारतातील सर्वात लोकप्रिय OTT Platforms ची नावे व त्यांचे Market Share खाली दिलेले आहेत-

OTT PlatformMarket Share
Disney+ Hotstar41%
Eros Now24%
Amazon Prime Video9%
Netflix7%
ZEE54%
ALT Balaji4%
Sony LIV3%
Apple TV1%
Yupp TV1%
Voot1%

निष्कर्ष –

आजच्या लेखामध्ये ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म ची संपूर्ण माहिती OTT Platform Information in Marathi समजून घेतली आहे. मला आशा आहे की आपल्याला ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म म्हणजे काय, What is OTT in Marathi हे पूर्णपणे समजले आहे. मला शक्य आहे तितकी माहीती देण्याचा मी प्रयत्न केला आहे.

आपल्याला जर या लेखामध्ये काही नवीन शिकण्यास मिळाले असेल तर सोशल मीडिया द्वारे मित्रांना हा लेख पाठवायला विसरू नका. लेख संबंधित काहीही अडचण किंवा शंका असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा. आपली समस्या नक्कीच सोडवली जाईल.

ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म म्हणजे काय, What is ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म हा लेख कसा वाटला?, हे मला कंमेंट करून कळवा. कॉम्पुटर, ब्लॉगिंग, इंटरनेट संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी या वेबसाईट ला परत- परत भेट देत राहा.

3 thoughts on “ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म म्हणजे काय, जाणून घ्या संपूर्ण माहिती”

 1. अतिशय साध्या आणि सोप्या भाषेतला तितकाच सुंदर लेख आहे हा.
  इंटरनेटवर असे अत्याधुनिक विषयांवरील मराठीत खूपच कमी लिखाण आहे.
  असे लेख वाढवावेत. त्यांची खूप गरज आहे इंटरनेटवर.
  राजीव देव.

  Reply

Leave a Comment