MHT CET Admit Card 2023, कसे करायचे डाउनलोड?

“MHT CET Admit Card 2023” या आमच्या ब्लॉग पोस्टमध्ये आपले स्वागत आहे! Maharashtra Common Entrance Test (MHT CET) ही State Common Entrance Test Cell द्वारे आयोजित केली जाणारी Entrance Exam आहे. MHT CET 2023 हि Exam अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी आणि संबंधित आरोग्य विज्ञानातील विविध पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आयोजित केलेली राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा आहे. MHT CET Hall Ticket 2023 हे परीक्षेला बसण्यासाठी लागणारे महत्वाचे डॉक्युमेंट आहे. यावरती तुमचे डिटेल्स आणि परीक्षा केंद्राचे डिटेल्स दिलेले असतात.

WhatsApp Group Join Group

MHT CET 2023 Entrance Exam 9 मे ते 20 मे 2023 रोजी नियोजित केली आहे. ज्या उमेदवारांनी यशस्वीरित्या अर्ज सबमिट केले आहेत त्यांचे हॉल तिकीट https://cetcell.mahacet.org/ वरती डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध झालेले आहे. त्यामुळे आजच्या ब्लॉग पोस्टमध्ये, मी तुम्हाला MHT CET Admit Card 2023 डाउनलोड करण्यासाठी चरण-दर-चरण प्रक्रियेद्वारे मार्गदर्शन करणार आहे आणि तुम्हाला परीक्षेबद्दल आवश्यक असलेली सर्व आवश्यक माहिती प्रदान करणार आहे. त्यामुळे, जर तुम्हाला Hall Ticket Download कसे करावे हे माहित नसेल तर हि पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचावी. तर चला सुरु करूयात.

महाराष्ट्र सीईटी हॉल तिकीट (MHT CET Admit Card 2023)

State Common Entrance Test Cell हे MHT CET PCB आणि PCM Group या दोन शिफ्टसाठी प्रवेशपत्र प्रकाशित करणार आहे. MH CET Admit Card 2023 परीक्षेच्या 6-7 दिवस आधी मे 2023 च्या पहिल्या आठवड्यात प्रकाशित होणे अपेक्षित आहे. MHT CET PCM परीक्षा 9 मे 2023 ते 13 मे 2023 या कालावधीत होईल, तर PCM Group परीक्षा 15 मे 2023 पासून सुरू होतील आणि 20 मे 2023 पर्यंत चालतील. ज्या उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी यशस्वीरित्या ऑनलाइन अर्ज सादर केला आहे, ते सर्व परीक्षेसाठी पात्र असतील. या परीक्षेचे Hall Ticket तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करावी लागतील ते कसे करायचे हे खाली दिलेले आहे.

Exam NameMaharashtra Common Entrance Test (MHT CET) 2023
Conducting BodyState Common Entrance Test Cell, Maharashtra
MHT CET Admit Card 2023 Release Date3rd May 2023 (Not Confirmed)
MHT CET 2023 Exam DatePCM – 9 May to 13 May
PCB – 15 May to 20 May
Official Websitehttps://cetcell.mahacet.org/

कसे करायचे हॉल तिकीट डाउनलोड? (MHT CET 2023 Admit Card Download)

तुम्ही MHT CET 2023 Entrance Exam साठी नोंदणी केलेली असेल तर परीक्षेला बसण्यासाठी तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करण्याची आवश्यकता आहे. MHT CET Admit Card हे परीक्षा केंद्रात प्रवेश पास म्हणून काम करते आणि त्यात उमेदवाराचे नाव, रोल नंबर, परीक्षेची तारीख, वेळ आणि ठिकाण यासारखी आवश्यक माहिती असते. तुमचे MHT CET 2023 Hall Ticket डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

1) MHT CET च्या आधिकारीक वेबसाईट ला भेट द्या – https://cetcell.mahacet.org/

MHT CET 2023 प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल, महाराष्ट्र च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यायची आहे.

2) “MHT CET 2023 Admit Card” लिंकवर क्लिक करा

आता तुमच्यासमोर MHT CET ची वेबसाईट ओपन होईल, त्यात तुम्हाला MHT CET 2023 Admit Card लिंक शोधायची आहे आणि त्यावर क्लिक करायचे आहे.

3) तुमच्या अकाउंट मध्ये लॉगिन करा

या स्टेप मध्ये तुम्हाला तुमचे Login credentials टाकायचे आहेत, जसे Application Number आणि Password. हे टाकल्यावर “Login” वरती क्लिक करायचे आहे.

4) प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि प्रिंट करा

तुम्ही लॉगिन केल्यांनतर, तुम्हाला तुमचे MHT CET 2023 प्रवेशपत्र दिसेल. Hall Ticket वर नमूद केलेले सर्व तपशील तपासून घ्या आणि ते तुमच्या डिव्हाइसवर सेव्ह करण्यासाठी “Download” बटणावर क्लिक करा. परीक्षा केंद्रावर Admit Card ची प्रिंट अनिवार्य आहे त्यामुळे प्रिंट काढून घ्या.

महाराष्ट्र सीईटी ऍडमिट कार्ड डिटेल्स (MHT CET 2023 Admit Card Deatils)

उमेदवारांच्या प्रवेशपत्रावर खालील माहिती दिलेली असेल –

  • उमेदवाराचे नाव
  • रोल नंबर
  • उमेदवाराचा फोटो
  • उमेदवाराची सही
  • परीक्षेचा वेळ
  • परीक्षेची तारीख
  • परीक्षेचे ठिकाण
  • उमेदवाराचा मोबाईल क्रमांक आणि पत्ता

महाराष्ट्र सीईटी ऍडमिट कार्ड सूचना (MHT CET Admit Card 2023)

जर तुम्ही महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा MHT CET 2023 साठी बसणार असाल, तर परीक्षेच्या सूचनांबद्दल जागरूक असणे आवश्यक आहे. MHT CET Admit Card 2023 परीक्षेसाठी तुम्हाला खालील महत्त्वाच्या सूचनांचे पालन करावे लागेल –

  • परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी, तुम्हाला ओळख पडताळणी करणे आवश्यक आहे.
  • परीक्षा संपण्यापूर्वी कोणत्याही अर्जदाराला परीक्षा कक्ष सोडण्याची परवानगी दिली जाणार नाही.
  • उमेदवारांनी चाचणी सुविधांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे आणि धोरणांचे पालन केले पाहिजे.
  • अर्जदारांनी ओळखीचा पुरावा म्हणून रेशन कार्ड आणि शिकाऊ परवाना यांसारखी ओळखपत्रे वापरणे टाळावे.

MHT CET Admit Card 2023 परीक्षेसाठी या काही आवश्यक सूचना आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे. कोणताही गोंधळ किंवा चुका टाळण्यासाठी अधिकृत परीक्षा मार्गदर्शक तत्त्वे आणि सूचनांचे पूर्णपणे पालन करण्याचे करा.

FAQ’s About MHT CET Admit Card 2023

प्रश्न –MHT CET Admit Card 2023 केव्हा रिलीज होणार आहे?
उत्तर –MHT CET Admit Card 2023 हे अंदाजे 3 मे 2023 रोजी रिलीज होण्याची अपेक्षा आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल, महाराष्ट्र त्यांच्या अधिकृत वेबसाईट वर अचूक तारीख जाहीर करेल.
प्रश्न –MHT CET Admit Card 2023 कोणत्या वेबसाईट वरून डाउनलोड करायचे?
उत्तर –तुम्ही cetcell.mahacet.org वरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.
प्रश्न – MHT CET 2023 प्रवेशपत्र कसे डाउनलोड करायचे?
उत्तर –MHT CET Admit Card 2023 डाउनलोड करण्यासाठी, तुम्हाला राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल, महाराष्ट्र च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल आणि तुमची लॉगिन क्रेडेन्शियल्स जसे की Application Number आणि Password एंटर करणे आवश्यक आहे.
प्रश्न –MHT CET Admit Card 2023 ची प्रिंटेड प्रत परीक्षा केंद्रावर घेऊन जाणे बंधनकारक आहे का?
उत्तर –होय, तुमच्या MHT CET Admit Card 2023 ची Printed Copy परीक्षा केंद्रावर घेऊन जाणे अनिवार्य आहे.

Leave a Comment