आपण सर्व बाजूनी तंत्रज्ञानाने घेरलेले आहोत. मानव दैनंदिन जीवनात अनेक प्रकारे या तंत्रज्ञानाचा वापर करत असतो. आपल्या सर्वात जवळचे तंत्रज्ञानाचे उदाहरण आहे मोबाईल. एके काळी फक्त दूरच्या व्यक्तीसाठी संपर्क साधण्यासाठी वापरला जाणारा मोबाईल आता अनेक कामांसाठी वापरला जात आहे. मोबाईल चा वापर आपण सर्वच करत असणार असे मला वाटते.
मोबाईल वापरणाऱ्या अनेक लोकांनी WiFi हा शब्द ऐकलाच असेल. WiFi हे एका मोबाईल मधून दुसऱ्या मोबाईल मध्ये डेटा हस्तांतरण करण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान आहे. हे आपल्याला माहीत आहे, पण आपण LiFi हे नाव ऐकलंय का? नाही ना! आज आपण याच LiFi Technology बद्दल माहिती घेणार आहोत. तर चला जास्त वेळ न लावता LiFi Technology बद्दल जाणून घेऊयात.
Li-Fi Technology काय आहे?
लायफाय हे दोन डिव्हाईस मध्ये डेटा हस्तांतरण करण्यासाठी निर्माण करण्यात आलेले वायरलेस ऑप्टिकल नेटवर्किंग तंत्रज्ञान आहे. LiFi चे पूर्ण नाव म्हणजेच फुल फॉर्म Light Fidelity असा होतो. WiFi मध्ये डेटा हस्तांतरण साठी रेडिओ वेव्हस चा माध्यम म्हणून वापर होतो, परंतु Lifi मध्ये Light म्हणजेच प्रकाशाचा वापर केला जातो. एका अध्ययनात समोर आले आहे की Lifi हे Wifi पेक्षा १०० पटीच्या वेगाने डेटा हस्तांतरण करण्यास सक्षम आहे.
प्रकाशाचा वेग हा सर्वात जास्त मानला जात आहे, पृथ्वीवर असा कोणताही घटक नाही जो प्रकाशाला हरवू शकेल. Lifi मध्ये प्रकाशाचा वापर केल्यामुळे Data Transfer प्रक्रिया वेगवान करणे शक्य झाले आहे. Lifi मध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रकाशाच्या या प्रक्रियेला VLC (Visible Light Communication) असे म्हणतात. प्रकाशाचा वापर Lifi मध्ये केल्याने याला रुग्णालयात, आणि विमानात वापरता येणार आहे कारण प्रकाश विद्युतचुंबकीय लहरी निर्माण करत नाही.
Li-Fi Technology कसे कार्य करते?
लायफाय ची कार्यपद्धती समजावून घेण्यास खूप सोपी आहे. Lifi हे Visible Light Communication सिस्टम आहे जे अत्यंत वेगाने डेटा Transfer करण्यास सक्षम आहे. या तंत्रज्ञानात LED Light Bulb वापरला जातो. हा बल्ब ऊर्जेच्या साहाय्याने प्रकाश उत्सर्जित करतो, हा प्रकाश मानवाच्या डोळ्यांना दिसत नाही कारण तो अदृश्य स्पेक्ट्रम मध्ये असतो.
प्रकाश उत्सर्जित करण्यासाठी LED बल्ब वापरला जातो, या प्रकाशाच्या लहरीसोबत डेटा पाठवला जातो. बल्ब ने पाठवलेल्या लहरी शोधण्यासाठी (Detect) प्राप्तकर्त्याकडे फोटो डिटेक्टर असते, त्याच्या मदतीने लहरींचा शोध घेतला जातो व पाठवलेला डेटा प्राप्त केला जातो. या मार्गाने डेटा ट्रान्सफर करण्याचा दर खूप वेगवान म्हणजे १०० जीबी प्रति सेकंद इतका आहे. यामुळे याला जगातील सर्वात वेगवान Wifi असे सुद्धा म्हणतात.
Wifi मध्ये Radio Waves वापरल्या जातात, परंतु Radio Waves चा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा खूप कमी असतो. Radio Waves मुळे Wifi चा वेग Lifi च्या तुलनेत कमी पडतो. Lifi मध्ये प्रकाश वापरला गेला त्यामुळे इतक्या वेगवान गतीने डेटा हस्तांतरण करणे मानवाला शक्य झाले आहे.
Li-Fi Technology चा इतिहास
Lifi Technology चे Founder म्हणजे संस्थापक Prof. Harald Hass हे आहेत. Prof. Harald Hass हे Edinburgh University मध्ये प्रोफेसर होते. यांनी Lifi तंत्रज्ञान बनवले व २०११ मध्ये या तंत्रज्ञानाचे प्रदर्शन केले.
- २०११ मध्ये TED Global Talk या कंपनी मार्फत Prof. Harald Hass यांनी Lifi ला बाजारात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर Hass यांनी Lifi तंत्रज्ञानाला प्रोमोट करण्यासाठी pureLifi कंपनी ची स्थापना केली.
- २०१३ – कंपनीने जगातील पहिले व्यावसायिक दृष्ट्या Lifi तंत्रज्ञान प्रसिध्द केले. त्याला Li-1st नावाने प्रसिध्द केले. Li-1st ने ग्राऊंडब्रेकींग वायरलेस कंमुनिकेशन तंत्रज्ञानाचा परिचय चिन्हांकित केला आणि बाजारात उपलब्ध असलेले जगातील पहिले LiFi तंत्रज्ञान बनले.
- २०१५ – त्यानंतर Li-Flame Release करण्यात आले, Li-Flame हे Lifi चे पहिले उत्पादन होते जे मोबाईल वायरलेस कंमुनिकेशन साठी मान्यता देणारे होते.
- २०१७ – LiFi-XC रिलीज झाले, हे डिव्हाईस एक प्लग आणि प्ले सिस्टीम आहे जे USB डिव्हाईस सह कार्य करते आणि लॅपटॉप, टॅब्लेट आणि स्मार्ट फोन मध्ये जोडण्यास योग्य आहे.
Li-Fi Technology चे फायदे व तोटे
LiFi तंत्रज्ञानाचे फायदे व तोटे दोन्हीही आहेत, तर चला Lifi चे Advantages आणि Disadvantages पाहुयात.
फायदे-
१) LiFi Technology च्या साहाय्याने २२४ जीबी डेटा प्रति सेकंद ट्रान्सफर करणे शक्य झाले आहे, वेगवान स्पीड हा LiFi चा सर्वात मोठा फायदा आहे.
२) LiFI Technology मध्ये डेटा ट्रान्सफर प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित असते.
३) LiFi डिव्हाईसेस कार्य करण्यासाठी कमी ऊर्जा वापरतात, त्यामुळे Internet of Thinks मध्ये ही वापरली जातात.
४) LiFi तंत्रज्ञान ऑप्टिकल बँडवर कार्य करते, ऑप्टिकल बँड आरोग्यासाठी हानिकारक नसतो, त्यामुळे Lifi आधारित प्रणालीमध्ये आरोग्यास हानी होत नाही.
तोटे-
१) Lifi मध्ये प्रकाश वापरला जातो व प्रकाश भिंतीना भेदू शकत नाही, त्यामुळे फक्त ठराविक जागेत इंटरनेट सुविधा Lifi मध्ये आहे.
२) Lifi का बाह्य वातावरणात वापरणे शक्य नाही कारण, सूर्यप्रकाश आणि जवळपास उपस्थित असलेल्या ऑप्टिकल स्रोतांमुळे यात हस्तक्षेप निर्माण होतो.
३) Lifi तंत्रज्ञान जास्त दूरपर्यंत सुविधा नाही देऊ शकत, Wifi तंत्रज्ञान ३२ मीटर पर्यंत सुविधा प्रदान करण्याचीक्षमता ठवते, परंतु Lifi तंत्रज्ञान फक्त १० मिटर पर्यंत मर्यादित आहे.
४) Lifi Technology ची चांगली कामगिरी अनुभवायची असेल तर महागडी उपकरणे वापरावी लागतील, म्हणजे हे तंत्रज्ञान कंपन्यांना परवडत नाही त्यामुळे अजूनही Lifi हे Wifi ची जागा घेऊ शकलेले नाही.
निष्कर्ष
Li-Fi तंत्रज्ञान २०२२ मध्ये सामान्य लोकांसाठी लाँच करण्यात येणार असा अंदाज वर्तवला जात आहे. फ्रान्स मध्ये एका किराणा दुकानात त्यांच्या ग्राहकांची दुकानातील लोकेशन ट्रॅक करण्यासाठी LiFi तंत्रज्ञान वापरले जाते आहे, यासोबतच भविष्यात Apple च्या काही उपकरणात LiFi Techbology वापरलेली आपल्याला दिसून येणार आहे. Lifi ची कंपनी purelifi ही या तंत्रज्ञानाला अजूनही कार्यक्षम बनवण्यासाठी कार्य करत आहे.
आज आपण लायफाय तंत्रज्ञान विषयी माहिती समजून घेतली आहे. मला वाटते की Li-Fi विषयी असलेल्या आपल्या सर्व अडचणी दूर झाल्या असतील. आपल्याला Li-Fi विषयी काही मत मांडायचे असेल तर खाली कंमेंट करू शकता. लेख आवडला असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करा. तंत्रज्ञान, इंटरनेट Computer संबंधित अश्याच माहितीसाठी मराठी ऑनलाईन या ब्लॉगची सदस्यता घ्या.
This lifi based information is very good at studies.*
*Thank you !*
Its very good information. .