iQOO Neo 9 Pro हा नवीन स्मार्टफोन भारतात नुकताच लाँच करण्यात आला आहे. दमदार गेमिंग स्मार्टफोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या फोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 मोबाईल प्रोसेसर देण्यात आलेले आहे, ज्याच्या मदतीने मोबाईल एकदम सुपर फास्ट चालतो. Neo 9 Pro हे iQOO Neo 7 Pro चे अपग्रेड केलेले वेरीअंट आहे.
iQOO कंपनीने iQOO Neo 9 Pro लाँच करून भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये आपला दबदबा वाढवला आहे. हा फोन Premimum Mid Range Device च्या रुपात डिझाईन करण्यात आलेले आहे. जो त्याच्या किमतीच्या मनाने आकर्षक फीचर्स प्रदान करतो. आजच्या पोस्टमध्ये आपण iQOO Neo 9 Pro ची फीचर्स, किंमत, उपलब्धता, याबद्दल माहिती घेणार आहोत. तर चला सुरू करूयात.
iQOO Neo 9 Pro Overview
iQOO कंपनीने नुकताच लाँच केलेला हा स्मार्टफोन iQOO Neo 7 Pro चे अपग्रेड केलेले वेरीअंट आहे. फोनला जबरदस्त स्पीड देण्यासाठी यामधे Snapdragon 8 Gen 2 हे प्रोसेसर देण्यात आलेले आहे. सोबतच 5160mAh ची दमदार बॅटरी सुद्धा दिलेली आहे, जिला चार्ज करण्यासाठी 120W चे फास्ट चार्ज अडॅप्टर देण्यात आलेले आहे. iQOO कंपनी गेमिंग स्मार्टफोन म्हणून ओळख आहे त्यामुळे iQOO Neo 9 Pro हा एक गेमिंग स्मार्टफोन आहे.
iQOO Neo 9 Pro Specifications
iQOO Neo 9 Pro हा अनेक खास Specifications सोबत येतो. खाली या स्मार्टफोन ची सर्व फीचर्स दिलेली आहेत.
- Display – 6.78-inch (1260×2800)
- Processor – Snapdragon 8 Gen 2
- Front Camera – 16MP
- Rear Camera – 50MP + 8MP
- RAM – 8GB, 12GB
- Storage – 128, 256GB
- Battery Capacity – 5160mAh
- Operating System – Android 14
iQOO Neo 9 Pro Price
iQOO Neo 9 Pro कंपनीने 3 varient मधे लाँच केला आहे, ज्यात 8GB + 128GB, 8GB + 256GB, 12GB + 256GB असे स्टोरेज चे पर्याय आहेत. iQOO Neo 9 Pro चे सेल 23 फेब्रुवारी पासून सुरू झालेले आहेत. iQOO Neo 9 Pro स्मार्टफोन घेण्यासाठी 1000 रुपयांची ऑफर देण्यात येत आहे जी 26 फेब्रुवारी पर्यंत राहणार आहे.
- 8GB RAM + 128GB स्टोरेज: ₹35,999
- 8GB RAM + 256GB स्टोरेज: ₹37,999
- 12GB RAM + 256GB स्टोरेज: ₹39,999
iQOO Neo 9 Pro Offers
iQOO Neo 9 Pro हा जबरदस्त स्मार्टफोन आता आकर्षक ऑफर्ससह बाजारात आला आहे. जर तुम्ही हा दमदार फोन घेण्याचा विचार करत असाल फोनसाठी असलेल्या ऑफर्स वरती एक नजर नक्की टाका. सर्वप्रथम, HDFC आणि ICICI बँक क्रेडिट कार्ड वापरून खरेदी केल्यावर तुम्हाला 2,000 रुपयांची आकर्षक सवलत मिळते.
गेमर्सना आनंद होईल कारण Jio यूजर्ससाठी 10,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त फायदे उपलब्ध आहेत. यात डेटा पॅक आणि डिव्हाइस खरेदीवर सूट यांचा समावेश आहे. त्याशिवाय, तुम्ही Amazon किंवा iQOO च्या वेबसाइटवरून हा फोन खरेदी केला तर 6 महिने No-Cost EMI चा पर्याय उपलब्ध आहे. म्हणजेच, फोनचा हप्ता हळूहळू भरता येतो त्यामुळे तुमच्या खर्चावर ताण येत नाही.