मानवाने आपला वेळ वाचवण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक गोष्टींचा शोध लावला आहे. इंटरनेट चा शोध लागल्यावर तर खूप प्रगती झाली. इंटरनेट च्या मदतीने आपण आपल्याला हव्या असलेल्या कोणत्याही विषयावर एका सेकंड मध्ये माहिती मिळवू शकतो. इंटरनेटच्या मदतीने एक मोठे काम सोपे झाले आहे ते म्हणजे डिजिटल पेमेंट. डिजिटल पेमेंट हि एक सिस्टम आहे, जी वापरून आपण कोणत्याही व्यक्तीला कोठूनही पैसे पाठवू शकतो.
आपल्या बँक खात्यातील पैसे थेट समोरच्या व्यक्तीच्या बँक अकाउंट मध्ये सुरक्षिततेने जमा केले जातात. डिजिटल पेमेंट करण्यासाठी काही कंपन्यांनी एप्स बनवले आहेत, फोन पे, गूगल पे, पेटीएम, ई. आज आपण या पोस्टमध्ये गूगल पे वरती खाते कसे तयार करायचे, हे जाणून घेणार आहोत. आधीच्या एका पोस्टमध्ये आपण फोन पे वरती खाते कसे तयार करायचे हे पाहिलेलं आहे. तर चला गूगल पे वर अकाउंट कसे उघडायचे याची प्रक्रिया शिकून घेऊयात.
गूगल पे अकाउंट कसे उघडायचे, संपूर्ण प्रक्रिया (How to Open Google Pay Account)
गूगल पे वरती खाते बनवण्यासाठी आपण खालील स्टेप्स Follow करायच्या आहेत. तर चला सुरू करूयात.
In this post we will learn how to create an account on Google Pay
Step 1: Download App
Google Pay वरती खाते ओपन करण्यासाठी सर्वात आधी हे App गुगल च्या प्ले स्टोर वरून Google Pay डाउनलोड करून इंस्टॉल करायचे आहे. Google Pay डाउनलोड करण्यासाठी वरील डाउनलोड बटन वर क्लिक करा.
Step 2: Install & Open
Google Pay इंस्टाल केल्यावर ते ओपन करा, आणि आपली आवडती भाषा निवडा, त्यामुळे पुढे संपूर्ण गूगल पे पुढे आपल्याला त्याच भाषेत दाखवले जाईल.
Step 3: Enter Mobile Number
आता आपला जो मोबाईल नंबर बँक अकाउंट ला लिंक आहे तो प्रविष्ट करा आणि Google Pay काही Permissions विचारते त्या Allow करा.
Step 4: Add Email Account
आता Google Pay स्वयंचलितपणे आपला ई-मेल आयडी शोधून काढतो आपल्याला फक्त Continue वरती क्लिक करायचे आहे.
Step 5: Enter OTP
आपण टाकलेल्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल तो Google Pay Automatically ऍक्सेस करून घेईल. आपल्याला तो टाकायची गरज नाही.
Step 6: Add App Lock
या नंतर Google Pay App ला पासवर्ड टाकायचा आहे तो तुम्ही स्क्रीन लॉक ठेऊ शकता किंवा वेगळा गूगल पिन बनवू शकता. सुरक्षेसाठी हि स्टेप खूप महत्वाची असते.
Step 7: Account Created
अभिनंदन! आपण यशस्वीपणे Google Pay चालू केले आहे. Google Pay वरती आपले अकाउंट तयार झाले आहे. आता पुढे आपण Google Pay मध्ये बँक खाते जोडून ऑनलाईन पेमेंट सुरू करू शकता.
निष्कर्ष –
आजच्या गूगल पे वर अकाउंट कसे उघडायचे, संपूर्ण प्रक्रिया, या पोस्टमध्ये फोन पे खाते उघडण्याची प्रक्रिया शिकून घेतली आहे. मला आशा आहे की तुम्हाला सर्वांना गूगल पे खाते बनवण्यात काहीही अडचण येणार नाही.
आपल्याला जर आजचा लेख आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. या पोस्टबद्दल काहीही प्रतिक्रिया असेल तर कंमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि अश्याच प्रकारच्या टिप्स आणि ट्रीक्ससाठी मराठी ऑनलाईन या वेबसाईटला वारंवार भेट देत राहा.