Google Gemini AI: काय आहे जेमिनी, कसे वापरावे आणि फायदे

आजच्या डिजिटल जगात Artificial Intelligence (AI) चा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. Open AI चे टूल Chat GPT लाँच झाल्यांनतर त्याला टक्कर देण्यासाठी गूगल ने Bard AI लाँच केले, परंतु ते घाई घाईत लाँच केल्यामुळे Chat GPT ला माघे टाकू शकले नाही पण अशा परिस्थितीत गूगल माघार घेईल हे कसे शक्य आहे. आता गूगल ने आपले सर्वात आधुनिक AI मॉडेल Gemini AI मॉडेल Bard AI मध्ये Active करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. Chat GPT ने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात खूप लक्षणीय प्रभाव पाडला आहे.

यावर्षी तंत्रज्ञानाचे ज्ञान असणारा जवळपास प्रत्येक व्यक्तीला Chat GPT बद्दल माहिती आहे. आता अशा परिस्थितीत जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेले गुगल मागे कसे राहणार? Chat GPT शी स्पर्धा करण्यासाठी Google ने Google Gemini AI नावाचे नवीन AI मॉडेल लाँच केले आहे. Google Gemini AI बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, हा लेख शेवटपर्यंत वाचावा, कारण आजच्या लेखात मी तुम्हाला Google Gemini AI बद्दल माहिती देणार आहे. तर चला सुरु करूयात.

Gemini AI काय आहे?

Gemini AI हे Google AI द्वारे विकसित केलेले एक Large Language Model (LLM) आहे. हे एक शक्तिशाली AI Model आहे, याचे कारण असे कि Gemini AI हे मजकूर, प्रोग्रामिंग कोड, ऑडिओ, इमेज आणि व्हिडिओ यासारख्या विविध प्रकारच्या डेटावर ट्रेन केलेले आहे. हे मजकूर तयार करू शकते, भाषांचे भाषांतर करू शकते, विविध प्रकारचे कंटेंट लिहू शकते आणि प्रश्नांची माहितीपूर्ण पद्धतीने उत्तरे तयार करून देऊ शकते.

Gemini AI ने सध्या फक्त बेसिक Nano Version लाँच केले गेले आहे, परंतु भविष्यात, Pro आणि Ultra Version देखील लाँच केले जातील. हे आता फक्त इंग्रजी भाषेत लाँच केले गेले आहे परंतु नंतर इतर काही प्रादेशिक भाषांसाठी लाँच केले जाईल. गुगल सुद्धा योजना करत आहे की Gemini AI मानवांच्या अनेक प्रकारच्या समस्या दूर करण्यात मदत करेल. DeepMind आणि Google च्या संशोधन टीमने Gemini AI विकसित करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत.

Gemini AI चे किती Versions आहेत?

Google ने Gemini AI तीन वेगवेगळ्या Version मध्ये (Gemini Nano, Gemini Pro आणि Gemini Ultra) लाँच केले आहे. जे कोणत्याही प्लॅटफॉर्मवर सहजतेने चालते, तर चला त्याबद्दल काही तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

1) Gemini Nano – Gemini Nano ची रचना स्मार्टफोनवर चालण्यासाठी केली गेली आहे. सध्या हे फक्त Google च्या Pixel फोनवरच वापरली जाऊ शकते. उच्च प्रक्रिया शक्ती असतानाही त्याचा वापर करता येईल अशा प्रकारे त्याची रचना करण्यात आली आहे.
2) Gemini Pro – Google च्या नवीनतम Google Bard ला सक्षम करण्यासाठी हे डिझाइन केले आहे. Gemini pro च्या मदतीने, Google Bard अचूक उत्तरे अधिक चांगली आणि जलद देऊ शकते. गुगल डेटा सेंटर्स वापरून त्याचा प्रतिसाद वेळ कमी करण्याची क्षमता आहे.
3) Gemini Ultra – जेमिनी अल्ट्रा अद्याप उपलब्ध नाही परंतु पुढील वर्षी येथे उपलब्ध होऊ शकते. हे आतापर्यंतचे सर्वात शक्तिशाली AI मॉडेल असेल जे मजकूर, ऑडिओ, व्हिडिओ आणि प्रतिमांवर काम करेल. Google ने त्याच्या सादरीकरणादरम्यान अल्ट्राची एक छोटीशी झलक दाखवली. या छोट्या झलकमध्ये, त्याने अनेक बेंचमार्क मागे सोडले. कंपनीच्या म्हणण्यानुसार ते याला अधिक शक्तिशाली बनवून लवकरच सामान्य लोकांसमोर सादर करणार आहेत.

Gemini AI कसे वापरावे?

जेव्हा Google एखादे नवीन टूल लॉन्च करते, तेव्हा प्रत्येक व्यक्ती त्याला वापरण्याची इच्छा बाळगतो. सध्याच्या काळात जर तुमच्याकडे Google Pixel 8 Pro स्मार्टफोन नसेल, तरीही तुम्ही तुमच्या लॅपटॉप किंवा संगणक मध्ये Gemini Pro चा वापर करू शकता. जे पूर्णपणे मोफत आहे. Gemini Pro ला Access करण्यासाठी तुम्ही खालील स्टेप्स फॉलो करू शकता.

  • Step 1 – सर्वप्रथम, तुम्ही तुमच्या डेस्कटॉपमध्ये Google Gemini AI ची वेबसाइट उघडा. यासाठी तुम्ही सर्च बारमध्ये “Google Gemini AI” लिहून सर्च करा आणि पहिल्या येणाऱ्या वेबसाइटवर क्लिक करा.
  • Step 2 – यानंतर, तुम्हाला लॉग इन करण्यास सांगितले जाईल. येथे तुम्ही तुमच्या Google Account च्या मदतीने Log in करा.
  • Step 3 – Log in केल्यावर , तुम्ही Gemini Pro मध्ये प्रवेश कराल. ज्यानंतर तुम्ही Gemini Pro चा वापर करू शकता. तुम्ही फक्त प्रश्न विचारायचे आहेत. तुम्हाला Gemini च्या मदतीने उत्तरे तयार करून मिळतील.

Gemini AI चे फायदे कोणते आहेत?

Google Gemini AI चे बरेच फायदे आहेत. ज्याबद्दल मी खाली माहिती दिली आहे.

  • जेमिनी एआयच्या मदतीने तुम्ही कठीण गणित किंवा भौतिकशास्त्र यासारख्या 57 विषयांच्या प्रश्नांचे निराकरण करू शकता.
  • जेमिनी AI च्या मदतीने तुम्ही तुमचा ब्लॉग किंवा वेबसाइट डिझाइन करण्यासाठी कोड तयार करू शकता.
  • जेमिनी AI च्या मदतीने तुम्ही प्रेझेंटेशन तयार करू शकता.
  • जेमिनी एआयच्या मदतीने तुम्ही मजकूर, प्रतिमा, ऑडिओ, व्हिडिओ इत्यादी तयार करू शकता.

निष्कर्ष

आजच्या लेखात आपण Gemini AI बद्दल माहिती घेतली आहे. या लेखात आम्ही तुम्हाला Gemini AI बद्दलची सर्व माहिती सोप्या भाषेत तपशीलवार दिली आहे, जेणेकरून तुम्हाला ती नीट समजेल आणि त्याचा वापर करता येईल. या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता.

मला आशा आहे की आजचा Google Gemini AI चा लेख तुम्हाला आवडला असेल. आपण हा लेख सोशल मीडियावर आपल्या मित्रांसह नक्की शेअर करा. जर तुम्हाला तंत्रज्ञानाविषयी नेहमी अपडेट राहायचे असेल तर तुम्ही माझ्या ब्लॉगवर येत रहावे कारण येथे मी तंत्रज्ञानाविषयी नवनवीन माहिती प्रकाशित करत असतो.

Leave a Comment