भारतात सध्या सीएए (CAA) हा कायदा नुकताच चर्चेत आलेला आहे, कारण सरकारने लोकसभा निवडणुकीचा आधी CAA कायदा लागू केलेला आहे. CAA कायदा हा एक महत्वाचा विषय आहे, त्यामुळे आजच्या पोस्टमध्ये आपण CAA Act in Marathi, CAA Full Form in Marathi बद्दल माहिती घेणार आहोत.
काय आहे सीएए (CAA) कायदा? (CAA Act in Marathi)
सीएएचा चा फुल फॉर्म म्हणजे “नागरिकत्व सुधारणा कायदा” (Citizenship Amendment Act) असा आहे. हा कायदा 2019 मध्ये भारतीय संसदेत पारित करण्यात आला होता आणि सोमवारी सरकार कडून संपुर्ण देशात लागू करण्यात आलेला आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या देशातून आलेल्या नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याशी संबंधित हा कायदा आहे.
सीएए कायदा हा भारतात राहणाऱ्या काही विशिष्ट देशांतील स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व प्रदान करण्याची तरतूद करतो. हे स्थलांतरित लोक हिंदू, शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन आणि पारशी असणे आवश्यक आहे, ज्यांना पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या देशांमध्ये धार्मिक छळाला सामोरे जावे लागते.
याउलट या कायद्यामुळे देशातील वातावरण खवळले आहे कारण हा कायदा धर्मनिरपेक्षतेवर हल्ला करतो असा आरोप विरोधकांनी केला आहे. कारण या कायद्यातून मुस्लिम स्थलांतरितांना वगळण्यात आले आहे. यामुळे भारताच्या धर्मनिरपेक्ष तत्वांचे उल्लंघन होत असल्याचे मत आहे.
सीएए हा सध्या भारतात चर्चेचा विषय आहे. हा कायदा काय करतो आणि त्याच्याशी संबंधित वाद काय आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्वाचे आहे.
या ब्लॉग पोस्टमध्ये सीएए (CAA) चा अर्थ आणि CAA Act in Marathi, CAA Full Form in Marathi असतो याबद्दल माहिती दिली आहे. जर तुम्हाला सीएए कायद्याबद्दल अधिक प्रश्न असतील तर तुम्ही खाली कमेंट मध्ये विचारू शकता आणि पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत सोशल मीडियावर नक्की शेअर करा.