आपल्याला सर्वांनाच माहित आहे की, संगणकाचा मानवाच्या जीवनात खूप महत्त्वाचा वाटा आहे. संगणकाच्या मदतीने आपण अशक्य असलेली कामे सुद्धा कमी वेळेत पूर्ण करतो. अशी कित्येक कामे आहेत जी संगणक शिवाय करणे मानवाला अशक्य आहे. (Uses of Computer in Marathi)
संगणकाचा वापर आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात केला जातो, जेणेकरून कामे कमी वेळेत व सोप्या पद्धतीने पार पाडत येतात. संगणकचा वापर शैक्षणिक, वैज्ञानिक, वैद्यकीय, ई अश्या सर्वच क्षेत्रात केला जातो. त्यामुळे आज आपण यातील काही महत्त्वाच्या क्षेत्रातील संगणकाचे उपयोग Uses of Computer in Marathi पाहणार आहोत.
संगणकाचे विविध क्षेत्रातील उपयोग | Uses of Computer in Marathi
Computer चा वापर जवळजवळ सर्वच क्षेत्रात केला जात आहे. शैक्षणिक (Educational) क्षेत्रात विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी, तर वैज्ञानिक (Scientific) क्षेत्रात रिसर्च करण्यासाठी.
या लेखात मी संगणकचा वापर केल्या जाणाऱ्या काही क्षेत्रांची माहिती दिलेली आहे. तरी सर्व माहिती समजून घेण्यासाठी आजचा हा लेख संपूर्ण वाचा.
१) घरगुती क्षेत्र
कॉम्पुटर चा घरात वापर करणे ही आता सामान्य गोष्ट झाली आहे. पूर्वीच्या काळी कदाचित कोणाच्या घरात संगणक आढळत असे, पण आताच्या काळात जवळपास सर्वच घरात कॉम्पुटर आहे.
वीज बिल ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी, मोबाईल रिचार्ज करण्यासाठी, मनोरंजन म्हणून गेम खेळण्यासाठी, सिनेमा पाहण्यासाठी आणि अजून असंख्य कामांसाठी संगणक वापरले जाते. आपण वापरत असलेला स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप हे सुद्धा एक प्रकारचे कॉम्पुटर आहेत.
घरात वापरल्या जाणाऱ्या Desktop Computer ला PC (Personal Computer) असे सुद्धा म्हणतात. घरोघरी संगणक वापरल्याने वेळेची बचत होते व जे काम करायला जास्त लोकांची गरज लागते ते काम संगणकाद्वारे एकच व्यक्ती करू शकतो.
2) वैद्यकीय क्षेत्र
Medical क्षेत्रासाठी संगणक हे एक वरदान ठरले आहे, कारण संगणकाच्या वापराने कोणत्याही आजाराचे निदान व उपचार करणे शक्य झाले आहे. यासोबतच दवाखान्यात पेशंटला असलेल्या आजाराचे रेकॉर्ड ठेवणे, औषधांचे रेकॉर्ड ठेवण्यासाठी संगणक उपयोगी ठरते.
वैद्यकीय क्षेत्रातील सुविधा जसे, X- Ray, CT Scan, आणि Operations, ई करण्यासाठी संगणक महत्वाची भूमिका निभावते. हॉस्पिटलमध्ये वापरत असलेल्या मशीन संगणक नियंत्रित करते. आता काही ठिकाणी Operation करण्यासाठी रोबोट चा वापर सुद्धा केला जात आहे.
वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आभासी तंत्रज्ञान (Virtual Reality) वापरले जाते, यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास चांगली मदत होते. एवढे महत्वाचे कार्ये करणारे संगणक हे खरोखरच वैद्यकीय क्षेत्रासाठी योगदानच आहे.
3) व्यावसायिक क्षेत्र
व्यावसायिक (Business) क्षेत्रात संगणकाच्या वापरात खूप वाढ झाली आहे. आज एकही Office नसेल जेथे संगणक वापरत नाहीत. संगणकाच्या वापराने व्यापाराची पद्धतच बदलून टाकली आहे.
संगणक (Uses of Computer in Marathi) आणि इंटरनेट च्या एकत्रित वापराने आपल्या व्यवसायाला सगळ्या जगभर पोहचवणे शक्य झाले आहे, आणि काम करण्यासाठी लागणारे कष्टही कमी झाले आहे. Cashless Payment सुविधा आल्याने आपण कोणालाही, कोठूनही घरबसल्या पैसे पाठवू शकतो, कर्मचाऱ्यांना पगार देताना सुद्धा Cashless Payment सुविधा वापरली जाते.
कारखान्यात असणाऱ्या मशीन मध्ये संगणकाच्या मदतीने स्वयंचलन (Automation) करण्यात आलेले आहे, त्यामुळे मशीन कमी वेळेत जास्त उत्पादन करत आहे. या सोबतच कामगारांचे कष्ट सुद्धा कमी झाले आहेत. याप्रकारे संगणक व्यवसाय मध्ये खूप उपयोगी Uses of Computer in Marathi ठरते आहे.
4) मनोरंजन क्षेत्र
संगणकात आलेल्या अदभुत Features मुळे आता मनोरंजन (Entertainment) क्षेत्रात संगणकाचा वापर वाढला आहे. Computer मुळे TV वापरण्याचे प्रमाण घटले आहे. YouTube आणि बऱ्याच Entertaining वेबसाईट मुळे आता सर्व Movies, TV वरील मालिका आपण हव्या त्या वेळी इंटरनेट च्या मदतीने पाहू शकतो आणि यासोबतच खर्च जेवढा TV ला लागतो तेवढाच इंटरनेट साठी लागतो, त्यामुळे लोक कॉम्पुटर, मोबाईल ला जास्त प्राधान्य देत आहेत.
लोक सिनेमा पाहण्यासाठी कॉम्पुटर (Uses of Computer in Marathi) वापरतात, पण जे लोक हे Movies बनवतात त्यांच्यासाठी तर कॉम्पुटर हे अति महत्वाचे आहे. बहुतेक Hollywood Movies मध्ये Animation चा वापर केला जातो, जे सर्व संगणकाच्या मदतीने बनवले जातात. Actors फक्त Stage वर Acting करतात आणि Computer द्वारे असे दाखवले जाते की ते दुसऱ्या ठिकाणी आहेत.
अनेक लोक मनोरंजन साठी संगणकावर गेम खेळतात. हे सर्व संगणक आणि इंटरनेट मुळे शक्य झाले आहे. गेम खेळण्यासाठी कॉम्पुटर मध्ये विविध गेम्स आणि प्ले स्टेशन आणि X- Box सारखे Gaming Consoles उपलब्ध आहेत. यासोबतच उत्तम Graphics Quality मुळे गेम खेळताना जास्त आनंद मिळतो.
5) शैक्षणिक क्षेत्र
शैक्षणिक (Educational) क्षेत्रात संगणकाचे (Uses of Computer in Marathi) आगमन झाल्याने शिक्षणाचा दर्जा उंचावला आहे. शाळा असो किंवा विद्यालय, विद्यार्थ्यांना संगणकाचा फायदा होत आहे. संगणक नव्हते तेव्हा शिक्षण फक्त पुस्तकांपर्यंत मर्यादित होते, संगणक आल्याने शिक्षणाला सीमाच राहिली नाही.
आता शिक्षण पुस्तकाच्या बाहेर आले आहे. विद्यार्थ्यांना कोणताही विषय शिकायचा असेल तर तो लगेच कॉम्पुटर च्या साहाय्याने इंटरनेट वर शिकतो आणि ते पण कमी वेळेत. विद्यार्थी किंवा शिक्षक एकमेकांपासून कितीही दूर असो, इंटरनेट च्या मदतीने Video Calling करून एकमेकांशी बोलता येते.
आताची परिस्थिती खूप वाईट आहे, लॉकडाऊन मुळे आता सर्व शाळा, विद्यालये बंद झाले आहेत. संगणकाच्या मदतीने विद्यार्थ्यांना घरबसल्या Video Lectures द्वारे शिकवले जात आहे. परीक्षा सुद्धा ऑनलाईन घेतल्या जात आहेत. हे सर्व फक्त संगणक आणि इंटरनेट मुळेच शक्य झाले आहे.
6) वैज्ञानिक क्षेत्र
वैज्ञानिक (Scientific) क्षेत्रातील संगणकाच्या उपयोगाची आपण कल्पनाच नाही करू शकत. Computer ने वैज्ञानिकांची Research करण्याची पद्धत च बदलली आहे. संगणकाची वेगाने समीकरणे सोडवण्याची क्षमता आणि माहिती साठवण्याची क्षमता वैज्ञानिकांना खास मदतीची ठरते. कोणताही प्रयोग (Experiment) करण्यासाठी प्रथम संगणकाची गरज असते.
संगणकाच्या (Uses of Computer in Marathi) मदतीने भविष्यात घडणाऱ्या घटनांचा अंदाज लावता येतो, यासाठी वैज्ञानिक लोकांनी प्रोग्रॅम्स सेट करून ठेवले आहेत. यांच्या मदतीने आपल्याला हवामानाचा अंदाज कळतो, किंवा कोणता ग्रह कोणत्या वेळी कोणत्या ठिकाणी असणार हे सुद्धा कळते. आता तुम्हीच विचार करा की मानवाच्या बुद्धीला हे शक्य आहे काय?
द्रव्यांचे तापमान मोजण्यासाठी वापरले जाणारे Thermometer सुद्धा एक संगणक आहे. अवकाशात मानवाने कृत्रिम उपग्रह (Artificial Satellite) सोडले आहेत, त्या उपग्रहांचे नियंत्रण संगणकाच्या मदतीने पृथ्वीवरून केले जाते. वैज्ञानिक क्षेत्रात संगणक नसते तर एवढे शोध लावणे मानवासाठी अशक्य होते.
7) सरकारी क्षेत्र
संगणक आता सरकारी (Governmental) कामांसाठी ही उपयोगी बनले आहे. संगणकाने सरकारी कामे कमी वेळेत पूर्ण होण्यास मदत होत आहे, कारण संगणकात असलेले Software Programs, Word Processors आणि Database Management System या वैशिष्ट्य चा सरकारी कामात उपयोग होत आहे.
सरकारी संस्था मध्ये संगणक दररोज वापरले जाते. जसे रेल्वे तिकिट बुकिंग करण्यासाठी, पोलीस स्टेशन मध्ये केस नोंदवण्यासाठी, सरकारी योजनांचे फॉर्म भरण्यासाठी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना पेमेंट करण्यासाठी. यासारखी अजून बरीच कामे संगणकाच्या मदतीने कमी वेळेत आणि सोप्या पद्धतीने केली जातात.
सरकारी योजनांसाठी सरकारने वेबसाईट बनवलेल्या आहेत. आपल्याला त्या वेबसाईट वर जाऊन फॉर्म भरावा लागतो, कागदपत्रे अपलोड करावी लागतात आणि मग पुढे आपल्याला योजनेचा लाभ मिळतो. पूर्वीच्या काळी लेखी फॉर्म द्यावे लागायचे व यात खूप वेळ जायचा. आता संगणकाच्या मदतीने सरकारी कामे सुद्धा वेगाने होत आहेत.
8) बँकिंग क्षेत्र
जगातील सर्व पैशांचे व्यवस्थापन करण्यात संगणकाचा (Uses of Computer in Marathi) एक महत्त्वाचा वाटा आहे. जेव्हापासून संगणक बँक मध्ये वापरले जाऊ लागले आहे तेव्हापासून बँकेतील कामाची गती आणि अचूकता वाढली आहे. संगणक बँकेतील कर्मचाऱ्यांना प्रभावीपणे व कार्यक्षमते ने कार्य करण्यास हातभार लावत आहे.
कोणत्या माणसाने Bank Account मधून पैसे काढले किंवा खात्यात जमा केले की याची नोंद लगेच संगणकाच्या मेमरी मध्ये होते, यामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांना लेखी नोंद करण्याची गरज राहिलेली नाही. (Uses of Computer in Marathi)
Online Payment System आल्याने आपण कोणालाही पैसे पाठवू शकतो अशी व्यवस्था सर्व बँकेने केली आहे. आपल्याला बँकेने डिजिटल पध्दतीने संगणक सोबत जोडले आहे आणि यामुळेच आपण ऑनलाईन Transaction करू शकतो.
निष्कर्ष
वरील सर्व माहिती वरून आपण एकच निष्कर्ष लावू शकतो की संगणका शिवाय मानव काहीही नाही. तर आता मी आपल्याला संगणकाचे महत्त्वाचे उपयोग Uses of Computer in Marathi सांगितले आहेत.
मला आशा आहे की आपल्याला संगणकाचा उपयोग कोणकोणत्या क्षेत्रात केला जातो याची संपूर्ण माहिती समजली असेल. तरी आपल्याला जर हा लेख आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरु नका.
लेखमधील (Uses of Computer in Marathi) कोणता घटक समजला नसेल तर कंमेंट करून नक्की विचारा आणि या प्रकारच्या अधिक माहितीसाठी आमच्या या ब्लॉगला वारंवार भेट द्यायला विसरू नका.
Battery Kay ahe