History of Computer: संगणकाचा इतिहास, जाणून घ्या माहिती

   आजच्या काळात आपण सर्व संगणकाचा आपल्या दैनंदिन जीवनात वापर करत आहोत. कोणी संगणक द्वारे Knowledge मिळवत आहे तर कोणी Entertainment करत आहे. संगणक हे मानवाच्या जीवनाचा एक हिस्सा बनले आहे. Computer द्वारे आपण जगातील कोणत्याही ठिकाणाची, व्यक्तीची माहिती काही सेकंद मध्ये मिळवत आहोत.

    आजच्या काळातील संगणक खूप शक्तिशाली आहेत परंतू संगणक एवढे आधुनिक बनवण्यासाठी शास्त्रज्ञांंना किती कष्ट करावे लागले असतील, याचा विचार आपण केला आहे का? संगणकाची सुरुवात कशाप्रकारे झाली, संगणकाचा निर्माण कशासाठी केला होता, हे सर्वांचे उत्तर आपल्याला या पोस्टमध्ये मिळेल.

    आपण या पोस्ट मध्ये संगणकाचा इतिहास माहिती पाहणार आहोत. सर्वात पहिल्या Abacus संगणक पासून ते आताच्या आधुनिक संगणकाचा एक प्रवास या लेख मध्ये दिलेला आहे. तर चला वेळ न लावता संगणकाचा इतिहास थोडक्यात सुरू करूयात.

संगणकाचा इतिहास, जाणून घ्या माहिती (History of Computer in Marathi)

    मानवाने पहिले संगणक गणिते करण्यासाठी बनवले होते, पण आता संगणकाच्या उपयोगाला मर्यादाच नाही राहिली. माणसाने पूर्वी अनेक संगणक बनवले, काहींना यश नाही मिळाले तर काही यशस्वी ठरले. मी या लेख मध्ये इतिहासातील काही यशस्वी संगणकाची माहिती दिलेली आहे

अबॅकस

   Abacus हे जगातील पहिले संगणक आहे. Abacus च्या जन्मापासून संगणकाचा विकासाला सुरुवात झाली. अबॅकस हा लाकडाचा एक साचा होता, त्यात उभे लोखंडाचे रॉड जोडलेले होते व त्यात मणी गुंफलेले होते. त्या मनीची योग्य पध्दतीने अबॅकस चालवनारे लोक हालचाली करून गणिते सोडवत असायचे.

    अबॅकस चा शोध चीनी लोकांनी लावला होता. त्यांनी सांगितल्या प्रमाणे अबॅकस चा निर्माण सुमारे 4000 वर्षांपूर्वी केला होता. चीनमध्ये अबॅकस ला “Suanpan” असे नाव होते. याचा अर्थ “Calculating Pan” असा होतो. अबॅकस वापर आजही चीन, जपान, रशिया या देशांमध्ये केला जातो.

नेपियर बोन्स

    Napier Bones हे जॉन नेपियर (John Napier) यांनी बनवलेले एक गणना करणारे यंत्र आहे. जॉन नेपियर हे एक गणिततज्ञ, भौतिक शाश्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. यांनी Logarithms चा शोध लावलेला आहे.

    या गणितीय उपकरणात 9 वेगवेगळ्या हाडांच्या काड्या होत्या आणि त्यावर अंक लिहलेले होते. हे यंत्र गुणाकार आणि भागाकार क्रिया करत असे. नेपियर बोन हे दशांश (Decimal) पध्दतीचा उपयोग करणारे पहिले उपकरण होते.

पास्कलाइन

    Pascaline या कॉम्पुटर चा शोध ब्लेझ पास्काल (Blaise Pascal) यांनी 1642 ते 1644 दरम्यान लावला होता. ब्लेझ पास्काल हे गणितीय तत्वज्ञानी होते. यांनी या मशीन चा निर्माण त्यांच्या वडिलांना मदत करण्यासाठी केला होता. त्यांचे वडील टॅक्स अकाउंटंट च्या कामाला होते.

    पास्कलाइन हे पहिले मेकॅनिकल (Mechanical and Automatic) व स्वयंचलित Calculator होते. हे फक्त बेरीज आणि वजाबाकी करू शकत होते. एका लाकडाच्या खोक्यात याची रचना केलेली होती, यात गिअर आणि चक्रे लावलेली होती.

    हे चक्र एका रांगेत लावलेली होती त्यातील एक फिरवले तर दुसरे आपोआप फिरायचे अशी त्याची रचना होते. पास्कलाइन द्वारे बेरीज आणि वजाबाकी केली जायची, यामुळे याला Adding Machine सुद्धा म्हटले जायचे.

लिबनिज व्हिल

    पास्काल यांच्या मशीनमध्ये सुधारणा करून लिबनिज यांनी 1673 साली लिबनिज व्हिल हे संगणक बनवले. Leibnitz Wheel ला स्टेप्ड रेकनर (Stepped Reckoner) असेही नाव आहे. Gottfried Wilhem Leibnitz हे जर्मनीतील एक गणित तत्वज्ञानी होते.

    लिबनिज व्हिल हे डिजिटल मेकॅनिकल Calculator आहे. पास्कलाइन मध्ये गिअर बसवलेले होते, पण यात गिअर च्या जागी बासरी च्या आकाराच्या काड्या लावलेल्या होत्या. Leibnitz यांनी 1673 मध्ये बनवलेले हे मशीन तीन शतके वापरण्यात आले.

डिफरंस इंजिन

    Difference Engine हे एक गणना करणारे यंत्र आहे, याचा निर्माण चार्ल्स बॅबेज (Charles Babage) यांनी 1820 मध्ये केला होता. चार्ल्स बॅबेज याना आधुनिक संगणकाचे पिता मानले जाते.

    हे वाफेवर चालणारे मशीन होते, हे मशीन लॉगरिथम्स टेबल सोडवण्यास सक्षम होते. Difference Engine हे जगातील पहिले यांत्रिक कॉम्पुटर असे सुद्धा ओळखले जाते. Charles Babage यांच्या संगणकाच्या विकासातील योगदानामुळे त्यांना “संगणकाचे जनक” म्हटले जाते.

अँनालिटीकल इंजिन

    Analytical Engine या Calculating मशीन चा निर्माण सुद्धा चार्ल्स बॅबेज यांनी केला. हे संगणक सामान्य हेतू संगणकाच्या प्रकारात (Types of Computer) येते. बॅबेज यांच्या Differential Engine मध्ये सुधारणा करून 1837 मध्ये अँनालिटीकल इंजिन समोर आणले गेले.

    अँनालिटीकल इंजिन हा चार्ल्स बॅबेज यांचा एक यशस्वी शोध आहे. हे संगणक कोणतेही गणितीय समस्या सोडवण्यास सक्षम होते, सर्वात महत्वाचे म्हणजे यात माहिती साठवून ठेवण्याची क्षमता होती. अँनालिटीकल इंजिन ला पंच कार्ड द्वारे इनपुट दिले जायचे.

टैबलेटिंग मशीन

   Tabulating Machine चा निर्माण हर्मन हॉलेरिथ (Herman Hollerith) यांनी 1890 साली केला. Herman Hollerith हे अमेरिकन संख्याशास्त्रज्ञ होते. या मशीन चा वापर 1890 ची अमेरिकेची जनगणना करण्यासाठी केला गेला. हॉलेरिथ यांनी Tabulating Machine कंपनी सुरू केली आणि 1924 मध्ये कंपनी चे नाव बदलून International Business Machine (IBM) ठेवण्यात आले.

    टैबलेटिंग मशीन आकडेवारी सारणी बनवत असे आणि यासोबतच माहिती रेकॉर्ड व साठवण्यास सक्षम होते. याला पंच कार्ड द्वारे इनपुट दिले जात असे. यांचा वापर मुख्यतः लेखा विभाग आणि यादी नियंत्रण क्षेत्रात केला गेला.

डिफरंस अँनालायझर

    Differential Analyzer हे जगातील पहिले इलेक्ट्रॉनिक संगणक आहे. याचा निर्माण वनेवर बुश (Vennevar Bush) यांनी 1930 मध्ये अमेरिकेत केला. हे एक Analog संगणक आहे. डिफरंस अँनालायझर हे 25 गणिते काही मिनिटात सोडवत असे.

    या मशीन मध्ये Vacumme ट्यूब चा वापर केलेला होता. Vacumme Tubes चा एक मोठा तोटा होता की हे खूप गरम होतात, त्यामुळे यांना थंड जागी ठेवणे गरजेचे होते.

मार्क 1

    या आधीच्या संगणकांमध्ये मोठेमोठे गणिते कमी वेळेत सोडवण्याची क्षमता नव्हती, त्यामुळे लोकांना आता शक्तिशाली संगणक ची गरज वाटू लागली. हे लक्षात घेऊन Harvard Aiken यांनी एक मशीन बनवायचे ठरवले जे मोठे गणिते सोडवू शकेल.

    Harvard यांचे स्वप्न 1944 मध्ये पूर्ण झाले. हार्वर्ड यांनी IBM सोबत मिळून एक बलाढ्य संगणक बनवले, त्याचे नाव Mark 1. हे जगातील पहिले Programmable संगणक आहे. Programmable म्हणजे या संगणकामध्ये प्रोग्रॅम सेट करता येत होते.

निष्कर्ष

     संगणकाचा इतिहास व माहिती, आता मी तुम्हाला दिलेली आहे आणि मला आशा आहे की तुम्हाला सर्व माहिती चांगल्याप्रकारे समजली असेल.

    आपणास जर काही अडचण असेल तर कंमेंट द्वारे विचारायला विसरू नका आणि या विषयावर अधिक माहितीसाठी ब्लॉगला वारंवार भेट देत राहा. आपल्याला अजून कोणत्याही विषयावर माहिती हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा.

    आपणास आजचा संगणकाचा इतिहास– History of Computer in Marathi हा लेख कसा वाटला, मला कंमेंट द्वारे नक्की कळवा.

1 thought on “History of Computer: संगणकाचा इतिहास, जाणून घ्या माहिती”

Leave a Comment