आजच्या काळात मोबाईल आणि कॉम्प्युटर हे आपल्या जीवनाचे अविभाज्य घटक बनले आहेत. दैनंदिन जीवनात आपण अनेक कामासाठी मोबाईल वापरतो जसे सोशल मीडिया, बँकिंग, कॉलिंग, गेमिंग, ई. मोबाईल मध्ये टाकण्यासाठी आपण सिम कार्ड खरेदी करतो त्यामुळे आपण इंटरनेट वापरू शकतो.
अनेक वेळा असे होते की आपण नवीन सिम कार्ड घेतो आणि आपले काम जुन्या सिम कार्ड शी असते. आपल्याला तर त्या सिम कार्ड बद्दल माहीत नसते मग त्याचा नंबर कसा शोधायचा. त्यासाठी मी आजची पोस्ट आणली आहे. आज आपण पाहुयात की आपल्या नावावर किती सिम कार्ड आहेत हे कसे तपासायचे. तर चला पोस्ट सुरू करूयात.
आपल्या नावावर किती मोबाईल नंबर आहेत, हे कसे तपासायचे?
भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने (DoT) https://tafcop.sancharsaathi.gov.in/telecomUser/ नावाचे एक पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलद्वारे तुम्ही तुमच्या नावावर किती सिम कार्ड नोंदणीकृत आहेत हे तपासू शकता. तर कसे तपासायचे त्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
1) सर्वात प्रथम भारतीय दूरसंचार विभागाच्या https://tafcop.sancharsaathi.gov.in/telecomUser/ या पोर्टल वरती जावे.
2) तेथे आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करून Captcha Code टाकावा आणि Validate Captcha वरती क्लिक करावे.
3) आता आपल्या मोबाईल वरती एक OTP येईल तो प्रविष्ट करावा आणि Login वरती क्लिक करावे.
4) लॉगिन झाल्यावर तुमच्या नावावर असलेल्या मोबाईल नंबर ची यादी दाखवली जाईल.
5) त्यातील जर कोणता नंबर तुमचा नसेल तर तुम्ही त्याला रिपोर्ट करून बंद करू शकता.
तुमच्या नावावर नोंदणीकृत असलेल्या अनावश्यक सिम कार्ड बंद करणे महत्वाचे आहे. असे केल्याने तुमची सुरक्षा आणि गोपनीयता वाढण्यास मदत होते.
अश्या प्रकारे तुम्ही तुमच्या नावावर असलेले मोबाईल नंबर तपासू शकता. मला आशा आहे की आपल्याला वरील पोस्ट पूर्णपणे समजली असेल. तरीही काही शंका असेल तर कमेंट करून विचारू शकता आणि पोस्ट आवडली असेल तर शेअर नक्की करा आणि अश्याच अजून माहितीसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.