आपल्या पैकी ज्यांना शेअर बाजार मध्ये रुची/ आवड आहे त्यांनी डिमॅट अकाउंट बद्दल कोठेतरी ऐकलेच असेल.
डिमॅट अकाउंट चा उपयोग शेअर्स ची खरेदी विक्री करण्यासाठी केला जातो. ज्याप्रमाणे बँक खात्यात पैसे ठेवले जातात अगदी त्याच प्रमाणे Demat Account मध्ये शेअर्स ठेवले जातात.
Demat चा फूल फॉर्म Dematerialize असा होतो. भौतिक स्वरूपातील Shares आणि Securities चे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतर करून डिमॅट खात्यात ठेवण्याच्या प्रक्रियेला Dematerialization असे म्हणतात.
डिमॅट खात्याच्या मदतीने कोणत्याही कंपनी चे शेअर्स खरेदी करता येतात, व डिजिटल पध्दतीने विकता येतात. या प्रक्रियेमुळे अनेक फायदे होतात की शेअर्स ची कागदपत्रे सांभाळून ठेवायची गरज लागत नाही.
डिमॅट खाते असल्याने शेअर्स ची चोरी होण्याची शक्यता शून्य झाली आहे, कारण डिमॅट खात्यात ठेवलेले शेअर्स इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असतात.
खरेदी केलेले शेअर्स विकण्यासाठी पूर्वीची प्रक्रिया खूप वेळ खाऊ होती व खूप मोठी सुद्धा. डिमॅट खाते आल्याने या प्रक्रियेला लागणारा वेळ फक्त एक मिनिट झाला आहे.
डिमॅट अकाउंटमुळे अनेक प्रकारे पैशाची थोडी-थोडी बचत होते. आपल्याला माहीतच असेल की प्रमाणपत्र, नोंदणी कागदपत्रे, यांचा ताळमेळ बनवण्यात थोडा खर्च येतो व वेळ पण जातो.