PhonePe डाउनलोड झाल्यावर त्यावर क्लिक करून App ओपन करा आणि REGISTER NOW यावर क्लिक करा.
Step: 2
आता आपल्यासमोर फोन पे खाते ओपन करण्याचा फॉर्म ओपन होईल. यामध्ये आपला फोन नंबर, पूर्ण नाव आणि एक चार अंकी पासवर्ड टाकायचा आहे आणि CONTINUE वर क्लिक करायचे आहे.
Step: 3
फोन नंबर टाकताना काळजी घ्यायची आहे की आपला मोबाईल नंबर बँक अकाउंटला लिंक असला पाहिजे. नंबर टाकल्यावर आपल्याला एक OTP प्राप्त होईल तो दिलेल्या जागेत टाकावा.
Step: 4
या स्टेप मध्ये आपल्याला भाषा निवडायची आहे. आपल्याला ज्या भाषेत सोपे जाईल ती निवडा आणि DONE वरती क्लिक करा.
Step: 5
अभिनंदन! आपण यशस्वीपणे फोन पे चालू केले आहे. फोन पे वरती आपले अकाउंट तयार झाले आहे. आता पुढे आपण फोन पे मध्ये बँक खाते जोडून ऑनलाईन पेमेंट सुरू करू शकता.
Step: 6
फोन पे वर अकाउंट कसे बनवावे, याबद्दल संपूर्ण माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.