आवश्यक
– आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक असणे आवश्यक आहे.
– जो मोबाईल नंबर आधार कार्ड ला लिंक आहे तो जवळ असावा आणि चालू असावा.
– Aadhaar Number, Enrolment, किंवा Virtual ID यापैकी एक असणे आवश्यक आहे.
1) सर्वात पहिले Aadhaar Official Website वरती जाऊन "Download Aadhaar" पर्यायावरती क्लिक करावे किंवा खालील लिंक वरती क्लिक करावे.
2) आता आपल्याकडे Aadhaar Number, Virtual ID किंवा Enrolment ID पैकी जे असेल तो पर्याय निवडावा.
3) दिलेल्या रकान्यात Aadhaar Number, Virtual ID किंवा Enrolment ID Enter करावा आणि त्याखाली दिलेला Captcha इंटर करावा.
4) आधार नंबर आणि Captcha भरून झाल्यावर "Send OTP" पर्यायावरती क्लिक करावे.
5) तुमचा जो मोबाईल नंबर आधार कार्ड ला लिंक आहे त्यावरती एक OTP येईल तो दिलेल्या जागेत Enter करायचा आहे.
6) OTP टाकल्यावर "Verify and Download" या बटन वरती क्लिक करायचे आहे.
7) आता तुम्हाला फोटोत दाखवल्याप्रमाणे Congratulations येईल म्हणजे तुमचे आधार कार्ड डाउनलोड झाले आहे.