गूगलच्या १० मजेशीर ट्रिक्स ज्या तुम्हाला माहित नसतील

Tilted Brush Stroke

by Marathi Online

Trick 1 - Do a Barrel Roll

गुगलच्या या ट्रिक चा आनंद घेण्यासाठी गुगल सर्च इंजिन वर जाऊन "Do a Barrel Roll" असे सर्च करा. या ट्रिक मध्ये पेज दोनदा गोल फिरते आणि शेवटी त्याच्या मूळ जागेवर येऊन थांबते.

Trick 2 - Askew

Askew ही गुगल ची एक मजेशीर ट्रिक आहे. यासाठी गुगल मध्ये जाऊन "Askew" असे सर्च करा. आता जे पेज ओपन होईल ते एका बाजूने थोडे तिरके असेल.

Trick 3 - Google Gravity

ही ट्रिक आपल्याला आश्चर्यचकित करून टाकेल. यासाठी गुगल मध्ये जाऊन "Google Gravity" असे सर्च करा आणि सर्वात पहिल्या वेबसाईटवर जा आणि पेजवर एकदा टच करा आणि मग पहा गंमत.

Trick 4 - Thanos

Marvel फॅन्स साठी ही एक खास ट्रिक आहे. ही पाहण्यासाठी गुगल वर "Thanos" सर्च करा आणि elgooG या वेबसाईटवर जा आणि “Thanos snap trick” वर क्लिक करा आणि गंमत पाहा.

Trick 5 - Google in 1988

गुगल हे सर्च इंजिन 1988 मध्ये कसे दिसत होते हे तुम्ही ही ट्रिक वापरून पाहू शकता. यासाठी गुगल वरती "Google in 1988" असे सर्च करा आणि सर्वात पहिल्या वेबसाईटवर जा.

Trick 6 - Epic Google

या ट्रिक मध्ये गुगल पेज ची साईझ वाढत राहते. यासाठी गुगल वर जाऊन "Epic Google" असे सर्च करा आणि सर्वात प्रथम वेबसाईटवर जा.

Trick 7 - Google Guitar

गुगल वरती जर आपल्याला गिटार वाजवायची असेल तर ही ट्रिक वापरा. यासाठी गुगल वरती "Google Guitar" असे सर्च करा आता गुगल च्या लोगो च्या जागी गिटार येईल.

Trick 8 - Google Underwater

Google Underwater या ट्रिक मध्ये तुम्हाला गुगल पाण्यात बुडालेले दिसेल. यासाठी गुगल वरती "Google Underwater" असे सर्च करा.

Trick 9 - Google Sphere

यामध्ये गुगल चे सर्व ऑपशन तुम्हाला गुगल च्या बाजूने फिरताने दिसतील. यासाठी गुगल वरती "Google Sphere" असे सर्च करा आणि पहिल्या वेबसाईटवर जा.

Trick 10 - Google Pacman

जर आपल्याला गुगल वरती Pacman खेळायची असेल तर Google Pacman असे सर्च करा, गुगल च्या लोगो च्या जागी Pacman गेम सुरू होईल.