डिजिटल सातबारा कसा काढायचा | Digital Sign 7/12

by Marathi Online

Digitally Signed Satbara काढण्यासाठी सर्वात आधी आपल्याला अधिकारीक सरकारी वेबसाईटवर जावे लागते व त्यांनतर पुढील प्रक्रिया करावी लागते, तर चला स्टेप नुसार सर्व प्रक्रिया समजून घेऊयात.

by Marathi Online

1) सर्वात आधी अधिकारीक सरकारी वेबसाईट https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/ यावर जावे.

by Marathi Online

2) आपण जर पहिल्यांदा सातबारा घेत असाल तर OTP Based Login वर Click करून आपल्या जवळ असलेला फोन नंबर टाकावा व Send OTP वर क्लिक करावे.

by Marathi Online

3) आता आपल्या नंबर वर एक OTP प्राप्त होईल तो दिलेल्या रकान्यात योग्यप्रकारे भरावा व Verify OTP वर क्लिक करावे.

by Marathi Online

4) आपल्या समोर आता एक फॉर्म दिसेल त्यात आपल्याला हव्या त्या ठिकाणाचा पत्ता भरावा लागतो, येथे आपला जिल्हा, तालुका, गाव, निवडा.

by Marathi Online

5) हे झाल्यावर आपल्या जमिनीचा गट नंबर टाकायचा आहे व त्यातील सर्वे नंबर सुध्दा टाकायचा आहे.

by Marathi Online

6) सातबारा उतारा मिळवण्यासाठी 15 रुपये भरावे लागतात त्यासाठी Recharge बटन वर क्लिक करायचे आहे.

by Marathi Online

7) एका सातबारा साठी 15 रुपये फी आहे, त्यानुसार आपण Payment करायचे आहे, आपल्याला योग्य ती पेमेंट पद्धत निवडून येथे पैसे भरा.

by Marathi Online

8) पैसे भरल्यावर सातबारा डाउनलोड साठी तयार होईल मग तुम्ही येथून डाउनलोड करून घ्यावा.