Online Aadhaar Card Download – इंडियन सिटीझन साठी आधार कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. कोणतेही सरकारी काम करण्यासाठी आधार कार्डची आवश्यकता लागते, कारण आधार कार्ड हे भारतीय नागरिकांच्या ओळखीचा पुरावा आहे. आधार कार्ड ला ओळखपत्र म्हणून वापरले जाते. एक भारतीय नागरिक असल्याने आपल्या सर्वांना कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेयाचा असेल तर आधार कार्ड लागतेच.
आधार कार्डशिवाय आपण मोबाईलचे सिम कार्ड सुद्धा खरेदी करू शकत नाही, त्यासाठी सुद्धा आधार कार्ड लागते. आधार कार्ड बनवण्यासाठी जवळच्या Enrolment Centre मध्ये जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी लागते. हे झाल्यावर जवळपास एक महिन्यानंतर आधार कार्ड आपल्याला पोस्टाने पाठवण्यात येते. अशी ही आधार कार्ड मिळवण्यासाठी ची प्रक्रिया असते.
Online Aadhaar Card Download: असे करा घरबसल्या आधार कार्ड डाउनलोड, ते हि 5 मिनटात
काही कारणास्तव जर आपले आधार कार्ड पोस्टाने मिळाले नाही किंवा आपल्याकडून जर आधार कार्ड हरवले गेले तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आपण Online Aadhaar Card Download करू शकता आणि त्याची प्रिंट काढून पुन्हा आधीच्यासारखे कार्ड बनवू शकता. तर चला आधार कार्ड ऑनलाईन (E-Aadhaar Card) डाउनलोड कसे करायचे हे पाहुयात.
Online Aadhaar Card Download करण्यासाठी
- आपले आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक असणे आवश्यक आहे. जर लिंक नसेल तर OTP येणार नाही आणि पुढील प्रक्रिया करता येणार नाही.
- जो मोबाईल नंबर आधार कार्ड ला लिंक आहे तो आपल्याजवळ असावा आणि चालू असावा कारण त्यावरती OTP येत असतो.
- आपल्याकडे Aadhaar Number, Enrolment ID, किंवा Virtual ID यापैकी एक असणे आवश्यक आहे.
ऑनलाईन आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
1) सर्वात पहिले Aadhaar Official Website वरती जाऊन “Download Aadhaar” पर्यायावरती क्लिक करावे किंवा खालील लिंक वरती क्लिक करावे.
2) आता आपल्याकडे Aadhaar Number, Virtual ID किंवा Enrolment ID पैकी जे असेल तो पर्याय निवडावा.
3) दिलेल्या रकान्यात Aadhaar Number, Virtual ID किंवा Enrolment ID Enter करावा आणि त्याखाली दिलेला Captcha इंटर करावा.
4) आधार नंबर आणि Captcha भरून झाल्यावर “Send OTP” पर्यायावरती क्लिक करावे.
5) तुमचा जो मोबाईल नंबर आधार कार्ड ला लिंक आहे त्यावरती एक OTP येईल तो दिलेल्या जागेत Enter करायचा आहे.
6) OTP टाकल्यावर “Verify and Download” या बटन वरती क्लिक करायचे आहे.
7) आता तुम्हाला फोटोत दाखवल्याप्रमाणे Congratulations येईल म्हणजे तुमचे आधार कार्ड डाउनलोड झाले आहे.
डाउनलोड झालेले आधार कार्ड हे PDF फाईल च्या स्वरूपात असते आणि पासवर्ड ने सुरक्षित केलेले असते, म्हणजे PDF ओपन करण्यासाठी पासवर्ड ची आवश्यकता असते.
समजा आपले नाव SWAPNIL आणि आपले जन्मवर्ष 2001 आहे तर पासवर्ड SWAP2001 असा असेल म्हणजे नावाचे पहिले चार अक्षर आणि जन्माचे वर्ष, असा आपला पासवर्ड असेल.
Online Aadhaar Card Download कसे करायचे हे आपल्याला आता चांगल्याप्रकारे समजले असेल. तरीही तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट करून विचारू शकता.
आजची ही पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि अश्याच पोस्ट मराठीमधून वाचण्यासाठी Marathi Online या वेबसाईट ला पुन्हा नक्की भेट द्या.