Maharashtra HSC Result 2022 – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज दुपारी 1 वाजता महाराष्ट्र मंडळाचा 12 वी बोर्ड निकाल 2022 (HSC Result 2022) जाहीर करण्याची घोषणा केली. महाराष्ट्र बोर्डाच्या 12वी परीक्षेच्या निकालासाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटद्वारे Maharashtra HSC Result 2022 in Marathi पाहू शकता.
काही दिवसांपूर्वी, महाराष्ट्र बोर्डाने 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र HSC 12 वीचा निकाल जाहीर करण्यासाठी मूल्यमापन धोरण जाहीर केले आहे. Maharashtra HSC Result 2022 अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर उपलब्ध केला जाईल तेथून आपण पाहू शकता व Maharashtra HSC Result 2022 Download करू शकता.
बारावीच्या अनेक विद्यार्थ्यांना HSC Result 2022 कसा पाहायचा हे माहित नसेल किंवा Maharashtra HSC Result 2022 Website सापडत नसेल. त्यामुळे आज मी या पोस्टमध्ये महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल कसा पाहायचा आणि डाउनलोड करायचा हे सांगणार आहे. या पोस्टमध्ये HSC Result 2022 कसा बघायचा याची पूर्ण प्रक्रिया दिलेली आहे तरी सर्वांनी काळजीपूर्वक हि पोस्ट वाचावी अशी विनंती.
Maharashtra HSC Result 2022 | बारावीचा निकाल कसा पाहायचा? | बारावी निकाल 2022
HSC Result आज दुपारी एक वाजता maharesult.nic.in या वेबसाईट वर जाहीर करण्यात येईल. यासोबतच अजून काही वेबसाईट आहेत त्यावर निकाल जाहीर करण्यात येणार आहे, त्यांची लिंक मी खाली देत आहे.
बारावीचा निकाल पाहण्यासाठी आपल्याला maharesult.nic.in या वेबसाईट वर जावे लागते व पुढील प्रक्रिया करावी लागते. तर चला Step By Step पाहुयात.
१) HSC Result 2022 पाहण्यासाठी सर्वात आधी आपल्या मोबाईल किंवा कॉम्युटर वरील ब्राउजर ओपन करावे.
२) आता ब्राऊजर वरील सर्च टॅब मध्ये maharesult.nic.in असे टाईप करावे किंवा थेट येथील लिंक वर क्लिक करावे. असे केल्याने आपण थेट निकालाच्या वेबसाईट वरती जाल.
३) जोपर्यंत १ वाजत नाहीत तोपर्यंत निकाल वेबसाईट वरती येणार नाही त्यामुळे १ वाजायची वाट पहा आणि मग वेबसाईट वरती जा.
४) बारावी बोर्ड निकाल जाहीर झाल्यावर maharesult.nic.in या वेबसाईट वरती Roll Number टाकायचा पर्याय ओपन होईल.
५) आपल्याला दिलेल्या जागेत रोल नंबर आणि आईचे नाव टाकून सबमिट करायचे आहे. सबमिट केल्यावर आपल्यासमोर आपला Maharashtra HSC Result 2022 ओपन होईल.
६) आता निकाल डाउनलोड करण्यासाठी तुम्ही सगळ्यात सोपे म्हणजे स्क्रीनशॉट काढू शकता किंवा प्रिंट चा पर्याय वर क्लिक करून PDF स्वरूपात सेव करू शकता किंवा प्रिंटर असेल तर प्रिंट काढूनही ठेऊ शकता.
Maharashtra HSC Result 2022 Website Links
- maharesult.nic.in
- hscresult.mkcl.org.
- mahahsscboard.in
- result.mh-hsc.ac.in
निष्कर्ष –
आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला Maharashtra HSC Result 2022 कसा पाहायचा हे सांगितले आहे. बारावीचा निकाल पाहण्यात विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत असतात, त्यामुळे आपल्याला जर काहीही अडचण असेल किंवा काही शंका असेल तर खाली कमेंट करून विचारू शकता आणि ज्यांना समस्येचं उत्तर माहित असेल ते कमेंट ला रिप्लाय पण देऊ शकता.
तर चला आता आपल्याला Maharashtra HSC Result 2022 कसा पाहायचा हे व्यवस्थितपणे समजले असेल. आपल्याला जर पोस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, म्हणजे त्यांना पण निकाल पाहता येईल. Maharashtra HSC Result 2022 साठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.