आजच्या काळात WhatsApp किती प्रसिद्ध झाले आहे हे तुम्हा सर्वांना माहित असेलच. WhatsApp आता प्रत्येक व्यक्तीच्या फोनमध्ये उपलब्ध असेल कारण हे एक असे ऍप्लिकेशन आहे ज्याद्वारे आपण कोणत्याही व्यक्तीला संदेश, व्हिडिओ, ऑडिओ, फोटो, कागदपत्रे पाठवू शकतो आणि याद्वारे आपण दुसऱ्याला ऑडिओ कॉल आणि व्हिडिओ कॉल देखील करू शकतो.
नवीन WhatsApp Account कसे खोलावे?
या पोस्टमध्ये आपण WhatsApp Account Create कसे करायचे हे Step By स्टेप पाहणार आहोत. त्यामुळे पोस्ट शेवटपर्यंत वाचा.
1) Download and Install WhatsApp
WhatsApp वरती अकाउंट बनवण्यासाठी सर्वात आधी WhatsApp डाउनलोड करावे लागते, त्यासाठी Google Play Store वरती जावे आणि WhatsApp सर्च करावे. येथे सर्वात पहिले WhatsApp येईन ते डाउनलोड करावे आणि इन्स्टॉल करावे. याशिवाय तुम्ही WhatsApp च्या Official Website वरून सुद्धा WhatsApp डाउनलोड करू शकता.
2) Accept Terms and Conditions
आपण जेंव्हा पहिल्यांदा WhatsApp ओपन करता त्यावेळी तुम्हाला एक Welcome पेज दिसेल. त्यावरती WhatsApp Terms of Service and Privacy Policy दिलेल्या असतात, त्या एकदा नक्की वाचा आणि AGREE AND CONTINUE वरती क्लिक करा.
3) Enter Mobile Number
या स्टेप मध्ये आपल्याला आपला मोबाईल नंबर Enter करायचा आहे. ज्या मोबाईल नंबर वरती तुम्हाला WhatsApp Account बनवायचे आहे तो नंबर टाकावा आणि लक्षात ठेवा कि तो नंबर चालू असला पाहिजे आणि आत्ता तुमच्या जवळ असला पाहिजे.
4) Verify OTP
नंबर एंटर केल्यावर त्या नंबर वरती एक OTP येईल तो दिलेल्या जागेत टाकावा आणि Verify करावे.
5) Backup Checking
नंबर Verify केल्यानंतर, WhatsApp या नंबरचा बॅकअप तपासतो. जर तुम्ही या नंबरवर आधी WhatsApp आयडी बनवला असेल तर GIVE PERMISSION वरती क्लिक करून परवानगी द्यावी. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच WhatsApp खाते तयार करत असाल, तर तुम्ही SKIP वर टॅप करून पुढे जावे.
6) Enter Profile Info
आता येथे आपले नाव, Profile Photo म्हणजेच DP अपलोड करायचा आहे. आपले नाव योग्य टाकावे कारण ते सर्वाना दिसणार आहे आणि हे झाल्यावर NEXT वरती क्लिक करावे.
7) Account Created
अभिनंदन! तुमचे WhatsApp Account तयार झाले आहे. आता तुम्ही WhatsApp च्या मोफत चॅटिंगचा आनंद घेऊ शकता.
आता तुम्हाला समजले असेल की व्हाट्सएप मध्ये Account कसे बनवायचे, जर तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांना देखील WhatsApp अकाउंट कसे बनवायचे हे समजेल आणि तुम्हाला जर WhatsApp वरती अकाउंट बनवताना काही अडचण आली तर कमेंट करून नक्की विचारा.