गूगल क्लासरूम काय आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Google Classroom Information in Marathi: मानव हळू हळू ऑनलाईन विश्वात प्रवेश करत आहे. एक असे विश्व ज्यात कामे इंटरनेट च्या मदतीने कमी वेळात पूर्ण होतात, जसे मोबाईल रिचार्ज, इन्शुरन्स भरणे, पैसे पाठवणे, ऑनलाईन खरेदी करणे, ई. मागील काही वर्षात इंटरनेट मध्ये आधुनिकीकरण झाले आहे, यामुळे डिजिटल क्षेत्रात खूप प्रगती झाली आहे. याचा फायदा आता शिक्षण क्षेत्रातही सुरु झालेला आहे.

WhatsApp Group Join Group

Mackerel Fish in Marathi

कोरोना महामारी आल्यामुळे संपूर्ण जगभर लॉकडाउन लावण्यात आले. यामुळे सर्व शाळा, कॉलेज आणि महाविद्यालये बंद करण्यात आली. खूप वेळ होऊनही लॉकडाउन हटवणे शक्य झाले नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सरकारने ऑनलाईन शिक्षण पद्धत सुरू करून एक पर्यायी मार्ग काढला व ऑनलाईन पध्दतीने तासिका घेण्यास सुरुवात झाली.

गूगल क्लासरूम काय आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती | Google Classroom Information in Marathi

ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्यावर काही ऍप्स लोकप्रिय झाले, (Google Classroom Information in Marathi) कारण त्यांचा उपयोग ऑनलाईन शिक्षणात महत्वाचा वाटू लागला. या स्थितीत गुगल चे सुद्धा एक ऍप लोकप्रिय झाले, ज्याचे नाव Google Classroom असे आहे. आजच्या या लेखमध्ये आपण गुगल क्लासरूम ची माहिती घेणार आहोत. Google Classroom काय आहे, याला कोणी बनवले, याचे काय वैशिष्ट्ये आहेत, व कोठे उपयोग केला जातो हे सर्व या लेखात दिलेले आहे. पूर्ण माहिती प्राप्त करण्यासाठी लेख संपूर्ण वाचवा अशी विनंती.

गूगल क्लासरूम काय आहे?

गूगल क्लासरूम हे गूगल ने निर्माण केलेले एक प्लॅटफॉर्म आहे. गूगल ने हे शाळा, कॉलेज साठी विकसित केले आहे व हे पूर्णपणे मोफत आहे. गूगल क्लासरूम द्वारे ऑनलाईन पध्दतीने शिक्षकांना व विद्यार्थ्यांना एकत्रित जोडण्यात आले आहे. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात ऑनलाईन फाईल शेअर करण्यासाठी हे प्लॅटफॉर्म उपयोगी ठरते आहे.

विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मधील संभाषण सुधारण्याचे कार्य गूगल क्लासरूम करत आहे. या एप मध्ये ऑनलाईन पध्दतीने क्लास बनवण्याची सुविधा आहे, शिक्षक गूगल खात्याच्या मदतीने क्लास बनवून विद्यार्थ्यांना त्यात जोडू शकतात. गूगल क्लासरूम मध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना असाइनमेंट देऊ शकतात, मग त्या असाइनमेंट चे उत्तरे लिहून विद्यार्थी फाईल बनवतात व तेथे अपलोड करतात.

असाइनमेंट सोबत अजून काही वैशिष्ट्ये गूगल क्लासरूम मध्ये देण्यात आलेली आहेत. शिक्षक त्यावरून विद्यार्थ्यांना नोट्स शेअर करू शकतात, ऑनलाईन क्लास ठेऊ शकतात, असे वैशिष्ट्ये शिक्षकांसाठी देण्यात आलेली आहेत. विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेल्या असाइनमेंट Document, शिट्स, स्लाईल्ड च्या स्वरूपात अपलोड करू शकतात. हे एप त्याच्या वेगळेपणामुळे खूप लोकप्रिय झाले आहे.

गूगल क्लासरूम चा इतिहास

गूगल क्लासरूम (Google Classroom Information in Marathi) ची घोषणा गूगल ने ६ मे २०१४ रोजी प्रथम केली होती, त्यानंतर तीन महिन्यात म्हणजेच १२ ऑगस्ट २०१४ रोजी गूगल ने हे एप लाँच केले. सुरुवातीला या एप मध्ये जास्त Features नव्हते, त्यामुळे ते जास्त लोकप्रिय झाले नाही. गूगल ने हळू हळू क्लासरूम ला विकसित केले. खाली मी गूगल क्लासरूम चे नवीन वैशिष्ट्ये व त्यांना कधी क्लासरूम मध्ये जोडले हे दिले आहे.

  • २०१५ – गूगल क्लासरूम API वेबसाईट साठी शेअर बटन ची घोषणा केली. गूगल ने Assignments मध्ये Due-Date Feature आणले, त्यासाठी Calender ला क्लासरूम मध्ये जोडले.
  • २०१७ – यापूर्वी गूगल क्लासरूम मध्ये जॉईन होण्यासाठी G Suite Account ची आवश्यकता असायची. २०१७ मध्ये गूगल ने हे काढून साधारण गूगल खात्यावरून गुगल क्लासरूम जॉईन करण्याची सुविधा दिली.
  • २०१८ – गूगल ने क्लासरूम ला Redesign करण्याची घोषणा केली. नवीन क्लासवर्क सेक्शन जोडण्यात आला, ग्रेडिंग इंटरफेस मध्ये सुधारणा करण्यात आली व शिक्षकांसाठी काही नवीन Features जोडण्यात आले.
  • २०१९ – ७८ नवीन सचित्र थीम जोडण्यात आल्या, असाइनमेंट आणि टॉपिक Drag and Drop करण्याचे नवीन Feature क्लासवर्क मध्ये जोडण्यात आले.
  • २०२० – गूगल ने Google Meet ला Google Classroom शी जोडले, ज्यामुळे ऑनलाईन लेक्चर्स घेण्यास सोपे झाले. २०२० मध्ये लॉकडाउन मुळे ऑनलाईन शिक्षण सुरू झाले व Google Classroom चा वापर अचानक खूप मोठ्या संख्येने वाढला. त्यात Google ने अजून काही वैशिष्ट्य जोडले.

नवीन to-do Widget जोडण्यात आले, गूगल क्लासरूम मध्ये १० नवीन भाषांचा समावेश करण्यात आला, Google Docs, Google Sheets साठी Smart Correct आणि Auto-Compose Feature जोडले.

गूगल क्लासरूम ची वैशिष्ट्ये

गूगल क्लासरूम (Google Classroom Information in Marathi) मध्ये Google Drive, Google Docs, Google Sheets, Google Forms, ई हे काही गूगल चे टूल्स एकत्रितपणे वापरण्यात आलेले आहेत. गूगल क्लासरूम मुळे शैक्षणिक संस्थाना पेपर लेस सिस्टिममध्ये काम करण्यास गूगल क्लासरूम मदत करत आहे. गूगल कलासरूममध्ये अनेक महत्त्वाचे Features समाविष्ट करण्यात आलेले आहेत, त्यातील काही मी खाली स्पष्ट केली आहेत.

१) असाइनमेंट

गूगल क्लासरूम चे हे सर्वात अदित्वीय आणि आश्चर्यकारक वैशिष्ट्य आहे. या Feature च्या मदतीने शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांना असाइनमेंट चे कार्य देऊ शकतात. असाइनमेंट देण्यासाठी शिक्षक प्रश्नांची फाईल बनवून त्यांच्या क्लास मध्ये टाकू शकतात.

टाकलेली फाईल त्या क्लास च्या सर्व विद्यार्थ्यांना दृश्यमान असते, विद्यार्थी ती फाईल ओपन करून असाइनमेंट सोडवू शकतात. शिक्षकांना असाइनमेंट ला Due Date देण्याचा पर्यायही असतो, व कोणता विद्यार्थी कोणत्या वेळेला असाइनमेंट जमा करतो ते सुद्धा शिक्षकांना दाखवले जाते.

२) ग्रेडिंग

विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या असाइनमेंट तपासून त्यांना गुण देण्याची सुविधाला ग्रेडिंग असे म्हणतात. शिक्षकांसाठी हे Feature देण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांनी जमा केलेली फाईल शिक्षक उघडू शकतात, त्यात बदल करू शकतात, व ती डोउनलोड करून ठेवू शकतात.

शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांच्या असाइनमेंट चेक करतात व मार्क्स देतात. प्रत्येक विद्यार्थीसाठी वेगळी Grading System असते. Google Classroom (Google Classroom Information in Marathi) च्या मदतीने शिक्षक विद्यार्थ्यांवर पूर्णपणे नजर ठेऊ शकतात. जर कोणी असाइनमेंट जमा नाही केली तर त्याला नोटीस पाठवता येते.

३) कंमुनिकेशन

गूगल कलासरूम मध्ये सर्वोत्तम कंमुनिकेशन अनुभव प्रदान केला जातो. यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये उत्तम संवाद साधता यावा यासाठी Features दिलेले आहेत. असाइनमेंट देताना शिक्षकांना काही सूचना द्यायची असेल तर त्यासाठी कंमेंट लिहण्याचे वैशिष्ट्य दिलेले आहे.

कंमेंट करण्याचे वैशिष्ट्य विद्यार्थ्यांसाठी ही दिले आहे, हे वापरून विद्यार्थी त्यांना आलेल्या अडचणी विचारू शकतात. यासोबत असाइनमेंट तपासताना त्यात काही चुका असतील तर शिक्षण विद्यार्थ्याला वयक्तिक कंमेंट करून सांगू शकतात. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात संवाद साधण्यासाठी महत्त्वाचे Features या एप मध्ये आहेत.

४) अर्चिव कोर्स

क्लासरूम वर बनवण्यात (Google Classroom Information in Marathi) आलेले कोर्स विद्यार्थ्यांनी पूर्ण केल्यावर शिक्षक त्यांना संग्रहित करून ठेऊ शकतात, म्हणजे पुढील नवीन आलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा करण्याची आवश्यकता राहणार नाही. Archieve केलेला कोर्स Archieved Classes मध्ये साठवला जातो. या कोर्स ला शिक्षक आणि विद्यार्थी पाहू शकतात परंतु त्यामध्ये काहीही बदल नाही करू शकत.

५) मोबाईल अँप्लिकेशन

Google Classroom चे वेबसाईट व्हर्जन सर्वात आधी लाँच केलेले होते, परंतु सर्वांना सोपे व्हावे म्हणून गूगल ने २०१५ मध्ये Google क्लासरूम चे मोबाईल अँप्लिकेशन लाँच केले. हे अँप्लिकेशन Android आणि IOS दोन्ही व्यासपीठावर उपलब्ध आहे. Google क्लासरूम चे एप मध्ये रूपांतर केल्याने याची लोकप्रियता खूप वाढली, कारण हे वेबसाईट पेक्षा हाताळायला सोपे झाले.

गूगल क्लासरूम डाउनलोड

एक लोकप्रिय एप असलेले गूगल क्लासरूम (Google Classroom Information in Marathi) हे सर्वच ठिकाणी डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असणारच. गूगल ने आधी याची फक्त वेबसाईट बनवली होती, त्यावेळेस हे डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध नव्हते. २०१५ मध्ये गूगल ला क्लासरूम चे एप बनवायची गरज लागली कारण सर्वांकडे लॅपटॉप किंवा कॉम्पुटर असणे शक्य नाही.

गूगल ने २०१५ मध्ये गूगल क्लासरूम एप Android आणि IOS युजर्ससाठी लाँच केले. हे एप आता अँड्रॉइड युजर्स साठी गूगल च्या प्ले स्टोर वर व IOS युजर्स साठी App Store फ्री मध्ये उपलब्ध आहे. गूगल क्लासरूम एप ला डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या डाउनलोड बटन चा वापर करू शकता.

निष्कर्ष –

मी गूगल क्लासरूम बद्दल सर्व माहिती, Google Classroom Information in Marathi आपल्याला दिलेली आहे, असे मला वाटते व हि सर्व माहिती व्यवस्थितरित्या आपण समजून घेतली असेल अशी मी आशा करतो.

आत्ता चालू असलेल्या वाईट परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सरकारने ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय वापरला आहे, या एप विद्यार्थ्यांना व शिक्षकांना खूप मोलाचे सहकार्य करत आहे.आजचा लेख आपल्याला कसा वाटला हे मला खाली कंमेंट करून विचारू शकता.

लेखामध्ये काही नवीन माहिती मिळाली असेल तर मित्रांसोबत शेअर नक्की करा. लेख संबंधित काहीही अडचण असेल तर बिनधास्त कंमेंट करा आपली अडचण सोडवली जाईल. याच प्रकारच्या अधिक माहितीसाठी मराठी ऑनलाईन ब्लॉगला SUBSCRIBE करून ठेवा.

1 thought on “गूगल क्लासरूम काय आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती”

Leave a Comment