एंटीवायरस म्हणजे काय आणि कसे करते कार्य?

आपण जर संगणक किंवा लॅपटॉप वापरत असाल तर Antivirus बद्दल थोडीशी माहिती आपल्याला असेलच. कॉम्पुटर वायरस आपल्या संगणकासाठी खूप हानिकारक असतो, त्यामुळे वायरस ला रोखण्यासाठी Antivirus कॉम्पुटर मध्ये असावा लागतो. कॉम्पुटर मेमरी मध्ये अनेक महत्त्वाच्या फाईल असतात, यासोबतच वयक्तिक फोटो, विडिओ, ई गोष्टी आपण संगणक मध्ये स्टोर करून ठेवत असतो. संगणकीय वायरस या महत्त्वाच्या फाईल वर घात करते व त्यांना नुकसान पोहोचवते, त्यामुळे त्या निकामी होऊन जातात.

आपल्या कॉम्पुटर ला जर वायरस पासून दूर ठेवायचे असेल तर एंटीवायरस सॉफ्टवेअर इंस्टॉल करावे लागते. एंटीवायरस सॉफ्टवेअरकडे संगणकाला वायरस पासून सुरक्षित ठेवण्याची क्षमता असते. कॉम्पुटर क्षेत्रात AntiVirus चा खूप मोठा उपयोग असतो, त्यामुळे प्रत्येकाला याबद्दल माहिती असायला हवी. आपणही AntiVirus बद्दल माहिती, Antivirus Information in Marathi जाणून घेण्यास इच्छुक असाल तर आपण बरोबर ठिकाणी आला आहात.

आपण या लेख मध्ये Computer मध्ये वापरल्या जाणाऱ्या Antivirus सॉफ्टवेअर बद्दल माहिती मिळणार आहोत. Antivirus कसे कार्य करते, याचे फायदे, तोटे अशी सर्व मूळ व महत्वाची माहिती या लेख मध्ये एकत्रित केलेली आहे. एंटीवायरस बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटच्या शब्दापर्यंत वाचावा.

एंटीवायरस म्हणजे काय – What is Antivirus in Marathi

एंटीवायरस किंवा एंटीवायरस सॉफ्टवेअर ज्याला Anti-Malware या नावानेही ओळखले जाते, हे एक विशिष्ट कॉम्पुटर सॉफ्टवेअर आहे जे मालवेअर शोधण्यासाठी, त्यावर प्रतिबंध करण्यासाठी व मालवेअर ला संगणक प्रणालीतून काढून टाकण्यासाठी वापरले जाते. एंटीवायरस म्हणजे प्रोग्रामिंग केलेला एक कोड असतो. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर एंटीवायरस एक सॉफ्टवेअर आहे जे संगणक च्या प्रोग्रॅम्स मधील सर्व वायरस शोधते व संगणक मधून काढून टाकते.

एंटीवायरस संगणकाला Spyware, Adware, Ransomware, Keyloggers, Backdoors, Trojan Horse, ई हानिकारक वायरस पासून सुरक्षित ठेवते. संगणक मेमरी मधील सर्व फाईल ला सुरक्षा प्रदान करून एंटीवायरस हे सुरक्षा गार्ड सारखे काम करते. फक्त हे नाही तर नवीन अपडेट केलेले एंटीवायरस सोशल इंजिनिअरिंग, इंटरनेट बँकिंग, फिशिंग, ई मधून होत असलेल्या ऑनलाईन हल्ल्यांपासून आपल्याला दूर ठेवते.

एंटीवायरस कसे कार्य करते – How Antivirus Software Works in Marathi

एंटीवायरस ला संगणक मध्ये टाकण्यासाठी आपल्याला सर्वात आधी ते डाउनलोड करून इंस्टॉल करावे लागते. एंटीवायरस ला इंस्टॉल केल्यावर त्यांचे कार्य सुरू होते. एंटीवायरस संगणकाच्या प्रोग्रॅम्स मध्ये घुसते व सर्व कोड स्कॅन करण्यास सुरुवात करते. संगणक मधील सर्व फाईल स्कॅन करण्यास सुरुवात करते व विविध स्कॅनिंग तंत्रज्ञान वापरून संगणक मधील वायरस शोधून काढते. एंटीवायरस संगणक मधील वायरस शोधण्यासाठी खालील पद्धतींचा वापर करते.

  • १) Heuristic Based Detection
  • २) Sandbox Detection
  • ३) Signature Based Detection
  • ४) Data Mining Detection
  • ५) Behavioural Based Detection

संगणक मधील वायरस शोधून एंटीवायरस त्याला कायमस्वरूपी साठी हटवून टाकते व संगणकातील फाईल्स सुरक्षित करते.

एंटीवायरस ऑनलाईन पद्धतीने इंटरनेट वरून येणाऱ्या नवीन वायरस ला संगणक पासून दूर ठेवते. इंटरनेट वर आपण जर असुरक्षित वेबसाईटवर गेलो तर एंटीवायरस लगेच आपल्याला सूचित करते किंवा कोणती फाईल डाउनलोड करायची असेल तर एंटीवायरस सर्वात पहिले ती स्कॅन करते व सुरक्षित असेल तरच डाउनलोड करण्यास परवानगी देते.

एंटीवायरस चा इतिहास – History of Antivirus in Marathi

सर्वात पहिल्या संगणकीय वायरस चा जन्म ७० वर्षांपूर्वी झाला होता. त्याचे नाव Creeper असे होते. या वायरस ला १९७१ मध्ये बॉब थॉमस यांनी प्रयोगासाठी BBN Technologies कंपनी मध्ये बनवले होते. खरे तर हा वायरस नसून एक प्रायोगिक प्रोग्राम होता. मेन फ्रेम संगणकात हा Creeper प्रोग्राम विशिष्ट कार्यासाठी ठेवण्यात आलेला होता.

त्याच वर्षी एक शाश्रज्ञ नाव रे टॉमलिंसोन याने Creeper या प्रोग्राम ला अपडेट केले. त्याने याला Reaper असे नाव दिले. रे टॉमलिंसोन हे बॉब थॉमस चे सहाय्यक कामगार होते. आता या अपडेट केलेल्या Reaper ला आधीच्या Creeper च्या जागी बदली करायचे होते. त्यासाठी एक विशिष्ट तंत्रज्ञान वापरून सर्व संगणक ज्यात Creeper आहे त्यामध्ये Creeper ची बदली Reaper शी ऑनलाईन पध्दतीने करण्यात आली.

Reaper Program मध्ये Creeper चा शोध घेऊन त्याला हटवून टाकण्याचे वैशिष्ट्य विकसित करण्यात आले होते. याच घटनेतून Antivirus ची संकल्पना समोर आली. तेव्हापासून Creeper का जगातील पहिला वायरस आणि Reaper ला जगातील पहिला एंटीवायरस म्हटले गेले. १९८७ मध्ये आलेल्या Vienna Virus ला काढून टाकण्यासाठी जर्मन सुरक्षा तज्ञ Bernd Fix यांनी याच पद्धतीचा वापर करून एंटीवायरस चा यशस्वी निर्माण केला होता.

एंटीवायरस चे फायदे व तोटे – Advantages and Disadvantages of Antivirus in Marathi

एंटीवायरस संगणक सुरक्षेसाठी एक वरदान ठरले आहे, पण असे नाही की एंटीवायरस पूर्णपणे संगणक साठी योग्य असते कारण एंटीवायरस चे काही तोटे सुद्धा आहेत. तर चला आता एंटीवायरस चे Advantages आणि Disadvantages जाणून घेऊयात.

फायदे

  • १) संगणकला वायरस पासून सुरक्षित ठेवते.
  • २) ऑनलाईन होणाऱ्या मालवेअर हल्ल्यापासून आपल्या डेटाला सुरक्षित ठेवते.
  • ३) वायरस असलेल्या फाईल्स डाउनलोड करण्यापासून संगणकला रोखून ठेवते.
  • ४) ऑनलाईन व्यवहाराला सुरक्षा प्रदान करते.
  • ५) हार्ड डिस्क ला Corrupt होण्यापासून वाचवते.

तोटे

  • १) एंटीवायरस फुकट मिळत नाही त्यासाठी पैसे मोजावे लागतात.
  • २) एंटीवायरस असल्यावर सिस्टम चा वेग कमी होतो.
  • ३) एंटीवायरस ला जर कोणती Corrupt फाईल Repair नाही झाली तर त्या फाईल ला डिलीट करून टाकते.
  • ४) एंटीवायरस ला अपडेट नाही केले तर ते चांगले काम करत नाही.
  • ५) एंटीवायरस वर पूर्णपणे निर्भर राहता येत नाही, काही काळजी आपणही घ्यावी लागते.

काही लोकप्रिय एंटीवायरस ची नावे – Popular Antivirus Software

आपल्याला जर डेस्कटॉप कॉम्पुटर साठी किंवा लॅपटॉप साठी एंटीवायरस सॉफ्टवेअर विकत घ्यायचे असेल तर खालील नावे आपल्यासाठी उपयुक्त ठरतील.

  • Bitdefender Antivirus Plus
  • Kaspersky Anti-Virus
  • McAfee AntiVirus Plus
  • Webroot SecureAnywhere AntiVirus
  • ESET NOD32 Antivirus
  • Malwarebytes Premium
  • Norton AntiVirus Plus
  • Sophos Home Premium
  • F-Secure Anti-Virus

निष्कर्ष

आपल्याला माहीतच असेल की आताचे तंत्रज्ञानाचे युग आहे. या युगात ऑनलाईन जगातील सुरक्षा खूप महत्त्वाची असते. त्यासाठी आपल्या संगणक ला वायरस पासून दूर ठेवावे लागते. जेणेकरून आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित राहील. त्यासाठी कॉम्पुटर मध्ये एंटीवायरस इंस्टॉल असावे लागते हे आपण पाहिले.

या लेखमध्ये आपण एंटीवायरस बद्दल ज्ञान मिळवले आहे. एंटीवायरस कसे कार्य करते हे पण आपण जाणून घेतले आहे. मला आशा आहे की आपल्याला Antivirus Information in Marathi समजली असेल. तरीही काही शंका असेल तर खाली कंमेंट करू शकता आपल्याला जर काही प्रश्न असेल ते खाली कंमेंट करून विचारू शकता.

लेख मध्ये काही महत्वाची नवीन माहिती मिळाली असेल तर मित्रांसोबत शेअर नक्की करा. कॉम्पुटर बद्दल अश्याच माहितीसाठी या ब्लॉगला Subscribe नक्की करा, त्याने आमचे लेख आपण सर्वात आधी वाचू शकता.

Leave a Comment